जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / शिवजयंतीच्या मिरवणुकीला औरंगाबादमध्ये गालबोट, तरुणाची भोसकून हत्या

शिवजयंतीच्या मिरवणुकीला औरंगाबादमध्ये गालबोट, तरुणाची भोसकून हत्या

शिवजयंतीच्या मिरवणुकीला औरंगाबादमध्ये गालबोट, तरुणाची भोसकून हत्या

श्रीकांत हा नाचत असतानाच भांडण झालेले तरुण पुन्हा त्याच्या जवळ आले. त्यातल्या एकाने आपल्या जवळच्या चाकूने त्याच्यावर हल्ला केला.

  • -MIN READ
  • Last Updated :

औरंगाबाद 20 फेब्रुवारी : राज्यात आणि देशात शिवजयंती बुधवारी (19 फेब्रुवारी) उत्साहात साजरी झाली. ठिकठिकाणी मिरवणुका आणि शोभायात्रा काढून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. औरंगाबद शहरातही शिवजयंतीची मिरवणूक उत्साहात झाली. दरवर्षी ही मिरवणूक सगळ्यांचं आकर्षण असतं. मात्र काल झालेल्या मिरवणुकीला गालबोट लागल्याचं पुढे आलंय. मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणांचं आपसात भांडण झालं आणि त्यात एका तरुणाची भोसकून हत्या करण्यात आली. हत्या झालेल्या तरुणाचं नावं श्रीकांत गोपीचंद शिंदे असं आहे. श्रीकांत हा मिरवणुकीत सहभागी झाला होता. मिरवणूक शांतपणे पुढे जात असतानाच त्याचं आणि इतर काही तरुणांचं भांडण झालं. त्यानंतर सर्व जण पुन्हा मिरवणुकीत सहभागी झाले. श्रीकांत हा नाचत असतानाच भांडण झालेले तरुण पुन्हा त्याच्या जवळ आले. त्यातल्या एकाने आपल्या जवळच्या चाकूने त्याच्या छातीमध्ये वार केले. हिंगणघाट जळीत प्रकणातल्या आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न? या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात तो खाली कोसळला. हल्ल्यानंतर सर्व आरोपी पसार झाले. लोकांनी श्रीकांतला हॉस्पिटलमध्ये नेलं पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथकं तयार केली असून ते त्यांचा शोध घेत आहेत. भरधाव वेगात स्कॉर्पिओ ट्रकला धडकली, देव दर्शनावरून येणाऱ्या 6 जणांचा मृत्यू राज्यात शिवजयंतीचा मुख्य कार्यक्रम शिवनेरी किल्ल्यावर झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे यावेळी उपस्थित होते. तर राजधानी दिल्लीत नव्या महाराष्ट्र सदनात खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला विविध 12 देशांच्या राजदूतांनी हजेरी लावली होती. सगळ्यांचं भगवे फेटे बांधून मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं. यावेळी सर्व राजदूतांनी महारांचं कार्य महान असल्याचं सांगत त्यांच्या पराक्रमातून सर्व जगाने शिकण्यासारखं आहे असं मत व्यक्त केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात