News18 Lokmat

रॉबर्ट वाड्रांना 'ट्युमर'; उपचारांसाठी जायचंय लंडनला पण...

प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना ट्यूमर झाला असून इलाज करण्यासाठी त्यांची परदेशात जायची इच्छा आहे. त्यासंदर्भात त्यांनी दिल्लीच्या न्यायालयाची परवानगी मागितली. पण काळा पैसा लपवलेला आहे त्याच देशात त्यांना जायचं आहे, असं म्हणत ED ने त्यावर आक्षेप घेतलाय. काय आहे कोर्टाचा निर्णय?

News18 Lokmat | Updated On: May 29, 2019 09:18 PM IST

रॉबर्ट वाड्रांना 'ट्युमर'; उपचारांसाठी जायचंय लंडनला पण...

नवी दिल्ली, 29 मे : प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना ट्यूमर झाला असून इलाज करण्यासाठी त्यांची परदेशात जायची इच्छा आहे. त्यासंदर्भात त्यांनी दिल्लीच्या न्यायालयाची परवानगी मागितली. पण त्यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ED) वाड्रांना तशी परवानगी देऊ नये अशी विनंती केली आहे.

आर्थिक घोटाळ्यासंदर्भात ED तर्फे रॉबर्ट वाड्रांची चौकशी सुरू आहे. चौकशी टाळण्यासाठी वाड्रा देश सोडून पळून जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांना तशी परवानगी देऊ नये, अशी विनंती ED ने न्यायालयाला केली आहे. न्यायालयाने यासंदर्भातला निर्णय राखून ठेवला आहे. 3 जूनला न्यायालय यावर निर्णय देईल.

आपल्या मोठ्या आतड्यात ट्यूमर झाला आहे. त्याच्या इलाजासाठी आणि सेकंड ओपिनियन घेण्यासाठी ब्रिटन आणि इतर देशांत जायची परवानगी द्यावी अशी विनंती रॉबर्ट वाड्रा यांनी वकील के. टी. एस. तुलसी यांच्या मार्फत केली होती. वकिलांनी वाड्रा यांचे मेडिकल रिपोर्ट न्यायालयाला सादर केले आणि सेकंड ओपिनियनसाठी त्यांना लंडनला जायची परवानगी द्यावी अशी याचिका दाखल केली.

आदित्य ठाकरेंनी दत्तक घेतलेल्या 'यश' वाघाचा मृत्यू

ममता दीदींनी लिहिलं मोदींना पत्र : 'मी शपथविधी समारंभाला येणार होते पण...'

Loading...

रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी अंतिम टप्प्यावर आहे. त्यांना कदाचित ताब्यात घेऊन चौकशी करण्याची वेळ येऊ शकते. कारण त्यांच्यावरील आरोप गंभीर आहेत, असं ED तर्फे सांगण्यात आलं. वाड्रा त्याच देशात जाऊ इच्छितात, जिथे त्यांनी काळा पैसा लपवलेला आहे. ते कदाचित देश सोडून जाऊ शकतील, असं ईडीने कोर्टापुढे सांगितलं.

दोन्ही बाजूंचं ऐकून घेतल्यानंतर विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी 3 तारखेपर्यंत यावरचा निर्णय राखून ठेवत असल्याचं सांगितलं. रॉबर्ट वाड्रा यांना ED ने गुरुवारी (दि. 30 मे)दिल्लीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. ED ने पाठवलेल्या नोटिशीत वाड्रा यांनी सकाळी 10.30 वाजता ऑफिसमध्ये हजर राहावं, असं सांगितलं आहे. वाड्रा यांच्यावर लंडनमध्ये 19 लाख पाउंडांची बेहिशोबी मालमत्ता खरेदी प्रकरणी आणि करचुकवेगिरी केल्याचे आरोप आहेत.

VIDEO : चंद्रपूर नव्हे सूर्यपूर! कडक उन्हामुळे होतंय अंड्याचं ऑम्लेट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2019 09:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...