आदित्य ठाकरेंनी दत्तक घेतलेल्या 'यश' वाघाचा मृत्यू

आदित्य ठाकरेंनी यशच्या वर्षभराच्या जेवणाचा खर्च उचलला होता.

News18 Lokmat | Updated On: May 29, 2019 07:33 PM IST

आदित्य ठाकरेंनी दत्तक घेतलेल्या 'यश' वाघाचा मृत्यू

मुंबई 29 मे : बोरिवली नॅशनल पार्क मधील्या 12 वर्षांच्या यश वाघाचं कर्करोगाने बुधवारी निधन झालं. यश वाघाला दत्तक योजने अंतर्गत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी 2013मध्ये दत्तक घेतलं होतं. यशला कॅन्सर झाला होता. त्याला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले मात्र त्यांना यश आलं नाही.

यशचा जन्म 2008 मध्ये राष्ट्रीय उद्यानतच झाला होती. इथल्या बसंती वाघिणीचा तो बछडा होता. यश वाघाचा मृत्यू झाला असला तरी पर्यटकांसाठी तो सदैव जीवंतच राहणार आहे. कारण यश वर टॅक्सिडर्मी ची प्रकिया करणार आहे. त्यामुळे नँशनल पार्क मधील पर्यटकांसाठी नवीन आकर्षण 'यश' असणार आहे.

काय आहे टॅक्सिडर्मी पद्धत?

यात मृत जणावरांच्या शरीरावर प्रक्रिया करून त्यांचं जतन केलं जातं. ही प्रक्रिया करणारे देशात मोजकेच केंद्र आहे. त्यातलं एक केंद्र मुंबईतल्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये आहे. या आधीही काही प्राण्यांचं या पद्धतीने प्रक्रिया करून जत करण्यात आलं होतं.

दत्तक योजनेंतर्गत वर्षभर दत्तक घेतलेल्या प्राण्याच्या आहाराचा खर्च घेतला जातो. यश हा नॅशनल पार्कमधला अतिशय देखणा वाघ होता आणि पर्यटकांचं आकर्षणही होता. दोन वर्षांपूर्वी त्याला कॅन्सर झाल्याचं निदान झालं होतं. तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्याची प्रकृती काही सुधारली नाही.

Loading...

जंगलात असलेल्या वाघाचं आयुष्य हे साधारण 12 वर्षांचं असतं तर पिंजऱ्यात ठेवलेला वाघ हा थोडा जास्त वर्ष जगत असतो. यश हा 'वाघा'सारखं आयुष्य जगला अशी प्रतिक्रिया इथल्या डॉक्टरांनी व्यक्त केलीय.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 29, 2019 07:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...