जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना; प्रेयसीचे तुकडे करत कुकरमध्ये शिजवले, मग मिक्सरमध्ये बारीक करून..

Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना; प्रेयसीचे तुकडे करत कुकरमध्ये शिजवले, मग मिक्सरमध्ये बारीक करून..

आरोपीला पोलिसांनी अटक करुन हत्येसाठी वापरण्यात आलेलं साहित्य जप्त केलं

आरोपीला पोलिसांनी अटक करुन हत्येसाठी वापरण्यात आलेलं साहित्य जप्त केलं

Mira Road Crime: आरोपी मयत महिलेच्या मृतदेहाची तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकून शिजवायचा आणि त्यानंतर तो ते मिक्सरमध्ये बारीक करत असल्याची माहिती समोर आली आहे.

  • -MIN READ Thane,Maharashtra
  • Last Updated :

राजा मयाल, प्रतिनिधी ठाणे 08 जून : मिरारोडमध्ये मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. व्यक्तीने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणा-या आपल्या पार्टनरची निघृण हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे केल्याची आणि त्याची विल्हेवाट लावण्याची घटना उघडकीस आली आहे. सुञांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मयत महिलेच्या मृतदेहाची तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकून शिजवायचा आणि त्यानंतर तो ते मिक्सरमध्ये बारीक करत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या आरोपीला पोलिसांनी अटक करुन घरातील हत्येसाठी वापरण्यात आलेलं सर्व साहित्य जप्त केलं आहे. मीरा भाईंदर शहर हत्येच्या या घटनेनं पूर्णपणे हादरुन गेलं आहे. मीरा भाईंदरच्या उड्डाणपूलाच्या शेजारी गीता आकाशदिप या सोसायटीत गीता नगर फेस – 7 च्या “जे” विंग मधील सदनिका क्रमांक 704 मध्ये ही क्रूर घटना घडली आहे. या सदनिकेत मनोज साने वय 56 आणि त्याची रुम पार्टनर मयत सरस्वती वैद्य वय 32 हे दोघे राहत होते. मागच्या तीन वर्षांपासून हे जोडपं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये येथे राहत होतं. Mumbai hostel Crime : मुंबई बलात्कार आणि हत्या प्रकरणात धक्कादायक गोष्टी समोर; तरुणीची रुममेट.. या इमारतीत राहणाऱ्या शेजारच्या लोकांना दुर्गंधी येत असल्याने त्यांनी नयानगर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. नयानगर पोलिसांनी घरात प्रवेश केल्यानंतर या भयानक घटनेचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावरून ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नयानगर पोलीस ठाण्यात राञी उशीरापर्यंत सुरु होती. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीने मयताचे तुकडे तुकडे केले होते. हे तुकडे कटर मशीनने केल्याची माहिती समोर येत आहे. ही हत्या का करण्यात आली? याची अधिकृत माहिती चौकशीनंतर समोर येईल. सुञांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मनोज सानेला मयत सरस्वती वैद्यचं कुठेतरी अफेअर सुरु असल्याचा संशय येत होता. त्यामुळे मागील 3 ते 4 दिवासांपासून या दोघांचं भांडण सुरु होतं. मयत सरस्वती वैद्य हिने दोन ते तीन दिवसांपूर्वीच विष पित आपलं जीवन संपवलं होतं. तिच्या आत्महत्येस पोलीस आपल्याला कारणीभूत ठरवतील या भितीने त्याने मयत सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची शक्कल लढवली. सुञांच्या माहितीनुसार आरोपीने मयताच्या मृतदेहाचे विल्हेवाट लावण्यासाठी कटर मशीनने तुकडे तुकडे करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो ते तुकडे कुकरमध्ये बॉईल करायचा आणि त्यानंतर मिक्सरमध्ये टाकून बारीक करायचा आणि फेकून द्यायचा. त्याने सोसायटीच्या मागील बाजूच्या गटारातही मृतदेहाचे काही तुकडे फेकल्याची माहिती मिळत आहे. मृतदेहाचे तुकडे फेकण्यासाठी तो आपल्या बाईकचा वापर करायचा. पोलिसांनी राञी उशिरा हत्येसाठी वापरण्यात आलेलं घरातील सर्व सामान तसंच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरण्यात येणारी बाईकही जप्त केली आहे. सध्या या विषयावर अधिकृत माहिती देण्यास पोलीस टाळत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात