जाहिरात
मराठी बातम्या / देश / Road accident : ट्रक आणि कारची जोरदार धडक, भीषण अपघातात 6 जण जागीच ठार

Road accident : ट्रक आणि कारची जोरदार धडक, भीषण अपघातात 6 जण जागीच ठार

कार आणि ट्रकचा अपघात

कार आणि ट्रकचा अपघात

Road accident : हा अपघात एवढा भयंकर होता की कार आणि ट्रकला वेगळ करण्यासाठी जेसीबी बोलवण्याची वेळ आली.

  • -MIN READ Madhya Pradesh
  • Last Updated :

सागर : भरधाव ट्रकने कारला धडक दिली, या भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात एवढा भयंकर होता की कार आणि ट्रकला वेगळ करण्यासाठी जेसीबी बोलवण्याची वेळ आली. मध्य प्रदेशातील सागर इथे हा भीषण अपघात झाला. ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारचा चुराडा झाला आणि मोठं नुकसानही झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. कारमधील 6 जणांचा मृत्यू झाला होता. तर एक जखमी झाला आहे.

कावड यात्रे दरम्यान मोठी दुर्घटना, 6 भक्तांचा मृत्यू; असं काय घडलं?
News18लोकमत
News18लोकमत

जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे वाहन सागर बाजूकडून गडकोटाच्या दिशेने जात होते, तर गडकोटाकडून सागरच्या दिशेने एक ट्रक येत होता. रस्त्यात दोघांची भयंकर धडक झाली. या भीषण अपघातात कारचे स्टेअरिंग तुटलं.

पावसात रोज स्कूटी किंवा बाईकवरून प्रवास करता? मग या गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी!

कारमध्ये ७ तरुण होते त्यापैकी चार तरुणांचा जागीच मृत्यू, तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जेसीबी मशीनपासून वाहने वेगळी करण्यात आली. कारमध्ये अडकलेल्या तरुणांचे मृतदेह कापून काढण्याची वेळ आली आहे. या भीषण अपघातात मुकेश रकवार (28), पंकज रकवार (35), ब्रजेश ठाकूर (30), अर्पित जैन (30), गणेश रकवार (45), पवन रकवार (35) यांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी अर्पित जैन हा अंकुर कॉलनी, मकारोनिया आणि उर्वरित पूर्व तोरी सागर येथील रहिवासी आहे. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात