advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Safety Tips : पावसात रोज स्कूटी किंवा बाईकवरून प्रवास करता? मग या गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी!

Safety Tips : पावसात रोज स्कूटी किंवा बाईकवरून प्रवास करता? मग या गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी!

पावसाळ्यात रस्ते पाण्याने भरलेले असतात, किंवा दिवसभर ओले राहतात त्यामुळे ते गुळगुळीत होऊ शकतात. अशा रस्त्यांवरून अपघात होण्याची शक्यता जास्त असते. विशेषत: बाईक आणि स्कूटी ही वाहने पावसात सहज अपघाताला बळी पडतात. तुम्ही सुद्धा बाईक, स्कूटी चालवत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे अवश्य आहे, जेणेकरून तुमचा प्रवास सुरक्षित होईल.

01
पावसात गाडीवर फिरणे हा काही लोकांचा छंद असतो तर काहींना नाईलाजाने हे करावे लागते. घराबाहेर पडण्याचे कारण काहीही असो. पण पावसाळ्यात अनेकदा रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता असते. विशेषत: स्कूटी किंवा बाईक सारख्या दुचाकी चालवताना खबरदारी घेणे आवश्यक आहे.

02
मुसळधार पावसामुळे बहुतांश शहरातील रस्त्यावर खड्डे पडलेले दिसत नाहीत. तसेच रस्त्यावरील निसरड्यांमुळे अपघातात वाढ होत आहे. त्याचबरोबर दुचाकी वाहने चालवणारे लोक पावसात पडून जखमी होण्याची शक्यता असते. म्हणून बाईक आणि स्कूटी चालवताण काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते.

03
टायरकडे लक्ष द्या : पावसात बाईक किंवा स्कूटी नेण्यापूर्वी टायर तपासायला विसरू नका. जर तुमच्या टायरची पकड जीर्ण झाली असेल तर तुमचे वाहन रस्त्यावर सहज घसरते. त्यामुळे उशीर न करता टायर बदलून घ्या. याशिवाय टायरमधील हवा नियमितपणे तपासत राहा.

04
पाण्यातून गाडी हळू चालवा : अर्थात तुम्ही उत्तम ड्रायव्हर असालच. पण पावसाळ्यात बाईक किंवा स्कूटी हळू चालवणेच योग्य असते. त्यामुळे वाहनावर तुमचे नियंत्रण राहील आणि आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही तात्काळ ब्रेक लावून वाहन थांबवू शकता. बऱ्याचदा भरधाव वेगात ब्रेक लावल्याने गाडी घसरण्याची भीती असते.

05
सुरक्षित अंतर राखणे : पावसात तुमच्या समोर, मागे आणि पुढे जाणाऱ्या वाहनांपासून नेहमी अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच ओव्हरलोड वाहनांपासून पुरेसे अंतर ठेवा. गाडीचा हेडलाइटही चालू ठेवा. ज्यामुळे तुम्हाला पावसात बघायला त्रास होणार नाही आणि तुमच्या आजूबाजूला धावणारी वाहनेही सहज दिसतील.

06
ब्रेकचा योग्य वापर : पावसाळ्यात मागील ब्रेक लावणे केव्हाही चांगले. यामुळे तुमची गाडी हळूहळू थांबते. समोरचा ब्रेक लावल्याने गाडी अचानक थांबते. यामुळे तुमची गाडी तर घसरत. म्हणून आपत्कालीन परिस्थितीतही गाडी थांबवण्यासाठी पुढचे आणि मागचे ब्रेक एकत्र लावा आणि फक्त समोरचा ब्रेक लावणे टाळा.

07
पाणी साचलेला रास्ता घेणे टाळा : पावसाळ्यात पाणी साचलेल्या रस्त्यावर जाणे टाळा. रस्त्यावरील खड्डे न दिसल्यामुळे त्यामध्ये पडण्याची शक्यता तर असतेच. त्यासोबत बाईक किंवा स्कूटीच्या एक्झॉस्टमध्येही पाणी जाऊ शकते. त्यामुळे तुमची गाडी बंद पडू शकते. म्हणून पावसात शक्यतो कोरड्या रस्त्यावरूनच प्रवास करा.

  • FIRST PUBLISHED :
  • पावसात गाडीवर फिरणे हा काही लोकांचा छंद असतो तर काहींना नाईलाजाने हे करावे लागते. घराबाहेर पडण्याचे कारण काहीही असो. पण पावसाळ्यात अनेकदा रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता असते. विशेषत: स्कूटी किंवा बाईक सारख्या दुचाकी चालवताना खबरदारी घेणे आवश्यक आहे.

    MORE
    GALLERIES