मेरठ, 16 जुलै : मेरठमध्ये शनिवारी विजेच्या हायटेंशन वायरच्या खाली आल्याने कावड यात्रेसाठी निघालेल्या 6 भक्तांचा जागीच मृत्यू झाला आहे. यासोबतच 10 भक्त जखमी झाले असून त्यांना मेरठच्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी भरती करण्यात आले आहे. या घटनेमुळे आक्रमक झालेल्या भक्तांनी याविषयी नाराजी व्यक्त करून यासाठी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना कारणीभूत ठरवले आहे. हा अपघात मेरठच्या भवानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. येथे मोठे डीजे कावड हरिद्वारहून पाणी घेऊन मेरठला पोहोचले होते. गावात प्रवेश करण्यापूर्वी विजेची हायटेन्शन लाईन बंद केली जावी असे वीज विभागाला सांगण्यात आले होते. मात्र हाय टेंशन लाइन सुरूच राहिल्याने डीजे कावड हाय टेन्शन वायरला धडकली.
डीजे कावड हाय टेन्शन लाईनच्या धडकेत आल्याने मोठी दुर्घटना घडली. यात 6 भक्तांचा जागीच मृत्यू झाला तर त्याचवेळी 10 हून अधिक भक्त जखमी झाले. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात भरती करण्यात आले या दुर्घटनेला वीज विभागाला जबाबदार धरण्यात आले आहे. पर्वतावर कशी गेली बिबट्याची नवजात पिल्लं? मेंढपाळांमुळे वाचला जीव घटनास्थळी उपस्थित जमावाने दुर्घटनेनंतर तेथे गोंधळ घातला. या गोंधळाची माहिती मिळताच अनेक पोलीस ठाण्याचे पोलीस आणि उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. लोकांना समज देऊन शांत करण्याचा त्यांनी प्रयन्त केला. निष्काळजीपणा करणाऱ्या विद्युत अधिकाऱ्यांवर कारवाईचे आश्वासनही देण्यात आले आहे.