जाहिरात
मराठी बातम्या / देश / धक्कादायक! नव्या संसाराची सुरुवात होण्याआधीच सगळं संपलं, अख्खं कुटुंब उद्ध्वस्त

धक्कादायक! नव्या संसाराची सुरुवात होण्याआधीच सगळं संपलं, अख्खं कुटुंब उद्ध्वस्त

तिलक विधिवरुन परतताना अपघात

तिलक विधिवरुन परतताना अपघात

नव्या संसार करायचा मुहूर्त साधला पण…कुटुंबासोबत घडला धक्कादायक प्रकार

  • -MIN READ Uttar Pradesh
  • Last Updated :

बहराइच : मुलीच्या नव्या आयुष्याला सुरुवात होणार म्हणून सगळेच खूप होते. लग्न ठरलं सुपारी फुटली गोड-धोड बातमीने सगळ्यांची तोंड गोड केली. हा आनंद काहीच काळ टिकेल असं कोणाच्या ध्यानीमनी देखील नव्हतं. तिलक कार्यक्रम करुन घरी परत येत असताना अचानक मृत्यूनं गाठलं आणि स्वप्नांचा चुरा झाला. संसाराची सुरुवात होण्याआधीच सगळं काही संपलं अशी स्थिती होती. तिलक कार्यक्रम करुन घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळानं घाला घातला. भरधाव ट्रकने धडक दिली आणि 5 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत 13 जण जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक आणि पोलीस घटनास्थळावर पोहोचले.

News18लोकमत
News18लोकमत

News18

प्रवाशांनी भरलेल्या बसचं स्टेअरिंग लॉक झालं आणि पुढे जे घडलं ते भयंकर, पाहा PHOTO

पोलिसांनी जखमींना स्थानिक लोकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्यावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. धरधाव डंपर टेम्पोवर आदळल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली. डंपरला धडकल्याने टेम्पोचा चक्काचूर झाला. टेम्पोमध्ये प्रवास करणाऱ्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 13 हून अधिक जण जखमी झाले आहेत. 10 जणांना गंभीर अवस्थेत सीएचसी कैसरगंजमध्ये नेण्यात आले. सर्वांना कैसरगंज येथून जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.

कार चालकाला डुलकी लागली अन् घडलं भयंकर, अंगावर काटा आणणारे भीषण अपघाताचे PHOTO

प्रभारी निरीक्षक दद्दन सिंह यांनी सांगितले की, आरोपी चालक घटनास्थळावरून फरार झाला. डंपर चालकाने मद्यपान केलं होतं, त्यामुळे त्याचा नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात