मराठी बातम्या /बातम्या /देश /'हो, यासाठी PM मोदीच जबाबदार', केंद्रीय मंत्री पीयुष गोयल पंतप्रधानांबाबत काय म्हणाले?

'हो, यासाठी PM मोदीच जबाबदार', केंद्रीय मंत्री पीयुष गोयल पंतप्रधानांबाबत काय म्हणाले?

केंद्रीय मंत्री पीयुष गोयल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

केंद्रीय मंत्री पीयुष गोयल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी नेटवर्क 18 च्या रायझिंग इंडिया संमेलन 2023 मध्ये त्यांच्या आयुष्यातील हीरोबाबत सांगितलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली, 29 मार्च : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक तरी हीरो असतोच. ज्याच्याकडून आपण प्रेरणा घेतो, काहीतरी शिकतो आणि पुढे जातो. केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनाही त्यांच्या आयुष्यातील हीरोबाबत विचारण्यात आलं. नेटवर्क 18 च्या रायझिंग इंडिया संमेलन 2023 मध्ये त्यांनी याबाबत खुलासा केला आहे. त्यांचे रिअल कोण हे त्यांनी सांगितलं आहे.

केंद्रीय मंत्री पीयुष गोयल म्हणाले, "आयुष्यात आपल्या सर्वांच्या आयुष्यात कित्येक हिरो आहेत. कमी वयात माझा सर्वात जास्त संपर्क आला तो अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी. देशसेवेत त्यांनी स्वतःला समर्पित केलं, त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. राष्ट्रीय सेवा संघाच्या अनेक नेत्यांकडूनही शिकायला मिळालं. अमित शहांकडूनही नवीन विचार मिळतात. अनेकांनी माझ्या आयुष्यावर प्रभाव टाकला आहे. पण एकच हीरो निवडायचा असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी"

'ठाकरे गटातील 2 खासदार संपर्कात'; केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांचा Rising India मध्ये गौप्यस्फोट

"पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत काम करायला मिळालं हे माझं नशीब मानतो. दररोज त्यांच्याकडून काहीतरी नवीन शिकायला मिळतं. त्यांच्याकडून खूप प्रेरणा मिळते. त्यांचा अनुभव, त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. ज्यांनी देशाला पुढे नेलं, देशाचा आत्मविश्वास वाढवला. तेच देशाचे हिरो नंबर वन आहेत", असं म्हणत त्यांनी मोदींचं कौतुक केलं आहे.

विरोधक सर्व गोष्टींसाठी मोदींना जबाबदार ठरवतात, यावर पीयुष गोयल म्हणाले, "हो पंतप्रधान मोदी जबाबदार आहेत. गरीबांच्या आय़ुष्यात सुधारणा आणण्यासाठी, आर्थिक व्यवस्थेला मजबूत करण्यासाठी, भ्रष्टाचाऱ्यांना धडा शिकवण्यसाठी, पारदर्शी सरकार आणण्यासाठी, तेच जबाबदार आहेत"

" isDesktop="true" id="857778" >

"आता लोकशाहीची नव्हे भ्रष्टाचाऱ्यांची वाईट अवस्था झाली. लोकांमध्येही त्यांच्याबाबत संताप आहे", असंही ते म्हणाले.

रायझिंग इंडिया समिट 2023

न्यूज 18 नेटवर्क आणि पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड (सायरस पूनावाला ग्रुप) ने 'रायझिंग इंडिया समिट 2023' या दोन दिवसीय कॉन्क्लेव्हचं आयोजन केलं. दिल्लीतील हॉटेल ताज पॅलेसमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

यंदाचा विषय आहे 'द हीरोज ऑफ रायझिंग इंडिया'. ज्याचा उद्देश सर्वसामान्य भारतीयांच्या असामान्य कामगिरीवर प्रकाश टाकणं हा आहे. यादरम्यान अशा वीरांचा गौरव करण्यात आला ज्यांनी आपल्या अनोख्या उपायांनी तळागाळात सुधारणा करून लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पाडला.

संमेलनाचा पहिला दिवस शानदार होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा परिवहन, रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय मंत्री पियुष गोयल उपस्थित होते. त्यांच्यासह अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली.

First published:
top videos

    Tags: India, PM Narendra Modi