नवी दिल्ली, 29 मार्च : नितीन गडकरी केंद्रीय मंत्री आहेत. भाजपाचे नेते आहेत. पण राजकारणाशिवायही ते आणखी एक काम करतात. त्यासाठी त्यांना पैसेही मिळतात. नितीन गडकरी यांनी आपल्या खासगी आयुष्याबाबतही नेटवर्क 18 च्या रायझिंग इंडिया संमेलन 2023 मध्ये काही माहिती दिली आहे.
नितीन गडकरींना टीव्ही पाहायला आवडत नाही. आश्चर्य म्हणजे ते बातम्याही पाहत नाहीत. याचं कारण देताना ते म्हणाले, मी टीव्ही फार पाहत नाही, कार्यक्रम पाहत नाही. मी बातमी पाहत नाही, मला आवडतच नाही. याने काय केलं, त्याने काय केलं, असंच सर्वकाही असतं. सामान्य लोकांना यात रस नाही. माहिती महत्त्वाचं आहे. कोणी कोणाबाबत काय म्हटलं, यावर लोकांना काहीच रस नाही. लोकांना माहिती आवडते. मी युट्यूबवर बोलतो तेव्हा लोक संपूर्ण जगात ऐकतात. यूट्युब मला पैसे देतं खूप पैसे देतं.
'हो, यासाठी PM मोदीच जबाबदार', केंद्रीय मंत्री पीयुष गोयल पंतप्रधानांबाबत काय म्हणाले?
सकाळी उठल्यानंतर मी एक तासभर व्यायाम करतो. त्याचवेळी मी मी बातम्या ऐकतो, गाणी ऐकतो. असं ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरोधकांच्याही कामांना प्रोत्साहन देताना दिसतात. म्हणजे त्यांचं काही काम असेल तर विरोधक म्हणून ते करण्यास नकार देतात असं नाही. त्यामुळे विरोधी पक्ष ज्यावेळी सत्तेत होतं, त्यावेळी त्यांना कधी त्यांच्याकडून पार्टीत येण्याची ऑफर मिळाली नव्हती का? असा प्रश्न त्यांना रायझिंग इंडिया संमेलनात विचारण्यात आला.
'ठाकरे गटातील 2 खासदार संपर्कात'; केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांचा Rising India मध्ये गौप्यस्फोट
नितीन गडकरी म्हणाले, माझ्याकडे येणारे विरोधकच नाही तर सामान्य नागरिकांचीही कामं मी करतो. जर काम चांगलं, योग्य असेल तर ते मी करतोच. चुकीचं काम करत नाही. मी राजकारणी कमी आणि सामाजिक कार्यकर्ता जास्त आहे. मी खूप सामाजिक कार्य करतो. माझ्या मते, आर्थिक अहवालापेक्षा कामाचा अहवाल महत्त्वाचा आहे. तुम्ही काम चांगलं कराल तर लोक पक्ष, जात, धर्म यापलीकडे तुम्हाला पाहतात, तुम्हाला समर्थन देतात.
काँग्रेसकडून कधी ऑफऱ मिळाली होती का? याबाबत ते म्हणाले, पंतप्रधानांनी सांगितलं आहे 'सबका साथ सबका विकास'. देश कोणत्या पार्टीचा नाही तर देश नागरिकांचा आहे. मी भाजपाचा आहे, पार्टी सोडण्याचा प्रश्नच नाही, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.
रायझिंग इंडिया समिट 2023
न्यूज 18 नेटवर्क आणि पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड (सायरस पूनावाला ग्रुप) ने 'रायझिंग इंडिया समिट 2023' या दोन दिवसीय कॉन्क्लेव्हचं आयोजन केलं. दिल्लीतील हॉटेल ताज पॅलेसमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यंदाचा विषय आहे 'द हीरोज ऑफ रायझिंग इंडिया'. ज्याचा उद्देश सर्वसामान्य भारतीयांच्या असामान्य कामगिरीवर प्रकाश टाकणं हा आहे. यादरम्यान अशा वीरांचा गौरव करण्यात आला ज्यांनी आपल्या अनोख्या उपायांनी तळागाळात सुधारणा करून लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पाडला.
संमेलनाचा पहिला दिवस शानदार होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा परिवहन, रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय मंत्री पियुष गोयल उपस्थित होते. त्यांच्यासह अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India, Nitin gadkari