नवी दिल्ली, 30 मार्च : मोदी सरकारच्या सर्वात महत्त्वांकांक्षी प्रकल्पांंपैकी एक असलेला प्रोजेक्ट चित्ता. आफ्रिका खंडातील नामिबियाहून भारतात 8 चित्ते आणण्यात आले. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात या चित्त्यांना ठेवण्यात आलं. त्यापैकी एका चित्त्याचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला. तर त्यानंतर दोन दिवसांतच 4 बछड्यांच्या जन्माची गूड न्यूजही मिळाली. प्रोजेक्ट चित्ता का गरजेचा आहे, याचं कारण केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांनी सांगितलं.
न्यूज 18 रायझिंग इंडिया समिटमध्ये केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव आले. ते म्हणाले, "अवैध शिकार सर्वात मोठा गुन्हा आणि समस्या आहे. ज्याचा सामना आपण करतो आहोत. याच्याशी आपण लढत आहोत"
सारस आणि आरिफ यांची मैत्री तुटण्यावर ते म्हणाले, "जर तुम्ही सांगून विलुप्त होत असलेल्या प्राणी-पक्ष्यांची देखभाल करत असाल तर त्यात चुकीचं काही नाही. पण न सांगता असं करणं हे कायद्याचं उल्लंघन आहे. याचं राजकारणाशी काही देणंघेणं नाही. सारस एक विलुप्त होण्याच्या मार्गावर असलेला पक्षी आहे, त्याची देखरेख वनविभागाने करायला हवी"
पर्यावरणीय संतुलनासाठी प्रोजेक्ट चित्ता गरजेचा आहे, असं त्यांनी सांगितलं. तसंच आपण प्रोजेक्ट एलिफंटचेही ३० वर्षे पूर्ण करत आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली.
रायझिंग इंडिया समिट 2023
न्यूज 18 नेटवर्क आणि पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड (सायरस पूनावाला ग्रुप) ने 'रायझिंग इंडिया समिट 2023' या दोन दिवसीय कॉन्क्लेव्हचं आयोजन केलं. दिल्लीतील हॉटेल ताज पॅलेसमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यंदाचा विषय आहे 'द हीरोज ऑफ रायझिंग इंडिया'. ज्याचा उद्देश सर्वसामान्य भारतीयांच्या असामान्य कामगिरीवर प्रकाश टाकणं हा आहे. यादरम्यान अशा वीरांचा गौरव करण्यात आला ज्यांनी आपल्या अनोख्या उपायांनी तळागाळात सुधारणा करून लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पाडला.
Rising India: राम मंदिराविषयी हरदीप सिंह यांचं महत्वपूर्ण वक्तव्य, म्हणाले...
संमेलनाचा पहिला दिवस शानदार होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा परिवहन, रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय मंत्री पियुष गोयल उपस्थित होते. त्यांच्यासह अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली. आज संमेलनाचा दुसरा दिवस सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Environment, India, Wild animal