Rising India: केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी रायजिंग इंडिया समिटमध्ये आपली उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपले मत मांडले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, पुढच्या वर्षी राम नवीमचा उत्सव हा अयोध्येच्या राम मंदिरातच होईल. केंद्रीय पेट्रोलियम, नैसर्गिक वायू , गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्री हरदीप पुरी म्हणाले, ‘स्वातंत्र्यापासून ते 2014 पर्यंत शहरी पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. यासोबतच ते गुन्हेगारी स्वरूपाचे होते. याच कारणामुळे शहरी भागाकडे लक्ष देणं गरजेचं होतं. आता या भागांकडे लक्ष दिलं जातंय.’ नवीन संसदेच्या बांधकामाबाबत हरदीप पुरी म्हणाले की, ‘संसद भवन बांधले तेव्हा वसाहती प्रशासनाच्या मनात स्वातंत्र्याची कल्पनाच नव्हती. त्यांनी राष्ट्रपती भवन, संसद भवनावर ज्या वेळी काम केलं तेव्हा त्यांच्या डोक्यात आलंच नाही की, भारत कधी स्वतंत्र होऊ शकेल. पण आपण ज्यावेळी स्वतंत्र झालो. तेव्हाही संसद भवनाकडे लक्ष का देण्यात आलं नाही.’ हरदीप पुरी म्हणाले की, ‘नवीन संसद भवनाच्या उभारणीसाठी ऐतिहासिक महत्त्वाची कोणतीही इमारत पाडण्यात आलेली नाही. यासोबतच राजपथच्या नाम परिवर्तनाविषयी बोलताना मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले की, राजपथ हा शब्दच वसाहतवादी मानसिकता दर्शवतो. म्हणूनच कर्तव्य पथ असं नाव केलं गेलंय.
‘PM MODI यांच्या मुळे जम्मू-काश्मीर…; Rising India मध्ये उपराज्यपालांनी सांगितलं प्रदेशात काय घडलं?राहुल गांधींवरही ओढले ताशेरे
व्ही डी सावरकरांबाबत राहुल गांधींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले, मी इतिहासाचा विद्यार्थी होतो. आणि मी जे वाचले त्यानुसार भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत अनेक महान व्यक्तींनी आपले प्राण अर्पण केले. त्यांनी अनेक यातना सहन केल्या. सावरकर हे त्यापैकी एक होते. मी एका महाराष्ट्रीयन व्यक्तीशी वाद घातला असल्याने मी राज्याच्या भावनांना बांधील आहे. मला ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या त्याबद्दल मला आश्चर्य वाटत नाही. काँग्रेसच्या त्यांच्याच मित्रपक्षाने त्यावर टीका केली आहे. यावर मला फार काही बोलायचे नाही.’