जाहिरात
मराठी बातम्या / देश / Viral News : खुल्लम खुल्ला...थेट केदारनाथ मंदिरासमोरच प्रेयसीने प्रियकराला केलं प्रपोज

Viral News : खुल्लम खुल्ला...थेट केदारनाथ मंदिरासमोरच प्रेयसीने प्रियकराला केलं प्रपोज

काहीच दिवसांपूर्वी भररस्त्यातला एक रोमँटिक कपल डान्स व्हायरल झाला होता.

काहीच दिवसांपूर्वी भररस्त्यातला एक रोमँटिक कपल डान्स व्हायरल झाला होता.

याबाबत काहीजण दोघांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत, तर काहीजणांनी मंदिरासमोर असं कृत्य करणं चुकीचं असल्याचं म्हणत संताप व्यक्त केला आहे.

  • -MIN READ Local18 Rudraprayag,Uttarakhand
  • Last Updated :

सोनिया मिश्रा, प्रतिनिधी रुद्रप्रयाग, 3 जुलै : पावसाळा सुरू झाल्यापासून ठिकठिकाणहून कपलच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या आहेत. काहीच दिवसांपूर्वी भररस्त्यातला एक रोमँटिक कपल डान्स व्हायरल झाला होता. तर, आता थेट केदारनाथ मंदिरासमोर प्रेयसीने गुडघ्यावर बसून प्रियकराला प्रपोज केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. याबाबत काहीजण दोघांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत, तर काहीजणांनी मंदिरासमोर असं कृत्य करणं चुकीचं असल्याचं म्हणत संताप व्यक्त केला आहे. केदारनाथ धाम हे चारधाम यात्रेतील एक महत्त्वाचं ठिकाण असून लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. या मंदिरासमोर ज्या तरुणीने प्रियकराला लग्नासाठी प्रपोज केलं ती सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय आहे. विशाखा फुलसुंगे असं तिचं नाव असून तिला ‘रायडर गर्ल विशाखा’ या नावाने ओळखलं जातं. युट्यूबवर तिचे 10 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत, तर इंस्टाग्रामवर 8 लाख आणि फेसबुकवर 2 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती रजत प्रताप सिंह या तरुणाला प्रपोज करताना दिसत आहे. 30 जून रोजीचा हा व्हिडिओ तिने स्वतःच सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

News18लोकमत
News18लोकमत

व्हिडिओमध्ये असं दिसतंय की, विशाखा आणि रजत दोघांनीही पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले असून ते केदारनाथ मंदिरासमोर प्रार्थना करत आहेत. त्याचवेळी विशाखाला कोणीतरी अंगठी देतं आणि ती अचानक गुडघ्यावर बसून रजतला प्रपोज करते. त्यानंतर रजत तिला मिठीत घेतो. तिथे उपस्थित असलेले भाविकही हे दृश्य कॅमेऱ्यात कैद करताना दिसत आहेत. Guru Purnima: कशी झाली होती गुरुपौर्णिमेची सुरुवात; गुरुला का मानलं जातं देवांच्या समान हा व्हिडिओ पोस्ट करून विशाखाने लिहिलंय, ‘अखेर बऱ्याच प्लॅनिंगनंतर तो दिवस आला. मी मागील अनेक महिने या क्षणाची तयारी करत होती. भोलेनाथाच्या आशीर्वादाने…मी माझा आनंद व्यक्त नाही करू शकत आहे.’ तर रजतने ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देताना म्हटलंय, ‘एक कट्टर हिंदू असूनही मला या व्हिडिओमध्ये काहीच आक्षेपार्ह किंवा देवाला मान्य नसेल असं काही दिसत नाहीये. पूर्वी सर्व पवित्र विधी (विवाहसंबंधी) मंदिरातच पार पडायच्या. महादेवासमोर खोटं, लबाडी, दिखावा या कशालाच स्थान नसतं. जे असतं ते खऱ्या मनाने असतं. दरम्यान, विशाखा आणि रजतच्या या व्हिडिओवर अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर अनेकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी म्हटलं, ‘धार्मिक स्थळांची एक प्रतिष्ठा असते, काही मूल्य असतात, परंपरा असतात. त्यांचं पालन करणं आवश्यक आहे. धार्मिक स्थळांच्या प्रतिष्ठेला ठेस पोहोचवू नका’, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात