नवी दिल्ली, 13 मार्च : जम्मू आणि काश्मीरच्या बांदीपोरामध्ये शुक्रवारी लष्कराने 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला. लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत लष्कराने बेरार भागात दोन दहशतवादी ठार झाले. हे दोन्ही दहशतवादी काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येत सामील होते, असंही सूत्रांच्या हवाल्यानं वृत्त (Rahul Bhatt Justice served) आहे.
राहुल यांचे मारेकरी यापूर्वीही अनेक दहशतवादी घटनांमध्ये सामील होते. फैसल उर्फ सिकंदर आणि अबू उकासा अशी ठार झालेल्या दोन्ही पाकिस्तानी दहशतवाद्यांची नावे आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, या दोन दहशतवाद्यांपैकी एक फैसल हा यापूर्वी 10 डिसेंबर 2021 आणि 11 फेब्रुवारी 2022 रोजी बांदीपोरा येथील गुलशन चौक आणि निशात पार्क येथे दहशतवादी हैदरसह 3 पोलिसांच्या हत्येत सामील होता. या दहशतवाद्यांनी मध्य काश्मीर आणि दक्षिण काश्मीरमधील आपले लपण्याचे ठिकाण हलवले होते. यासोबतच इतर दहशतवादी कारवायांमध्येही हे लोक सहभागी होते.
सैन्याला असं मिळालं यश -
फैसलचा साथीदार हैदर 7 मे रोजी दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील देवसर येथे चकमकीत मारला गेला. यानंतर फैजलची बदली बडगाम येथे झाली आणि तो उकासामध्ये सामील झाला होता. आदल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी राहुल पंडितचा खून झाल्यानंतर तो पुन्हा बांदीपोरा येथे गेला. यादरम्यान पोलीस त्यांचा सतत माग काढत होते आणि अरगाममध्ये त्यांचा ठावठिकाणा शोधण्यातही यश आले. यानंतर शुक्रवारी 24 तासांच्या आत एलजेकेपी आणि एसएफने केलेल्या झटपट कारवाईत दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
हे वाचा - 3 वर्षांमध्ये देशभरातील 50 हजार सरकारी शाळा बंद! सरकारी अहवालातून माहिती उघड
गुरुवारी राहुलची हत्या झाली -
गुरुवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी राहुल भट्ट यांना जवळून लक्ष्य करत अंदाधुंद गोळीबार केला. गोळी लागताच राहुल रक्तबंबाळ होऊन खाली पडला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे कार्यालयात गोंधळ उडाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian army, Police Encounter