मराठी बातम्या /बातम्या /देश /

येस बँकेच्या खातेदारांना दिलासा, 50 हजार रु. काढण्याचे निर्बंध हटण्याची शक्यता

येस बँकेच्या खातेदारांना दिलासा, 50 हजार रु. काढण्याचे निर्बंध हटण्याची शक्यता

येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर व त्यांचे कुटुंबीय अशा 7 जणांविरुद्ध लुकआऊट नोटिस जारी करण्यात आली आहे

येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर व त्यांचे कुटुंबीय अशा 7 जणांविरुद्ध लुकआऊट नोटिस जारी करण्यात आली आहे

येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर व त्यांचे कुटुंबीय अशा 7 जणांविरुद्ध लुकआऊट नोटिस जारी करण्यात आली आहे

    मुंबई, 10 मार्च : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Yes Bank) येस बँकेचे खासगी संचालक मंडळ बरखास्त केले असून स्टेट बँकेचे माजी अर्थ सल्लागार प्रशांत कुमार (Prashant Kumar) य़ांची प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे. सोमवारी प्रशांत कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना येस बँकेच्या खातेदारांना दिलासा दिला आहे. आतापर्यंत येस बँकेतून केवळ 50 हजार रुपये काढण्याची मर्यादा होती. मात्र ही अट शनिवारपर्यंत शिथिल करण्यात येण्याची शक्यता प्रशांत कुमार यांनी सांगितले. एसबीआयने (SBI) येस बँकेचा बचाव करण्यासाठी तेथील 49 टक्के शेअर्स खरेदी करुन 2 हजार 450 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा आराखडा आरबीआयला  (RBI) सादर केला आहे. हा आराखडा आरबीआयने मंजूर केल्यानंतर येस बँकेवरील निर्बंध उठवण्यात येतील, अशी शक्यता प्रशांत कुमार यांनी व्यक्त केली आहे. याशिवाय येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर व त्यांचे कुटुंबीय अशा 7 जणांविरुद्ध लुकआऊट नोटिस जारी करण्यात आली आहे. यामध्ये त्यांची पत्नी बिंदू, मुलगी रोशनी, राखी, राधा, डीएचएफएलचे संचालक कपिल वाधवान, आरकेडब्लूचे संचालक धीरज वाधवान यांचा समावेश आहे. ते देश सोडून बाहेर जाऊ शकत नाही. संबंधित - येस बॅंक घोटाळा : राणा कपूर आणि प्रियंका गांधींचं कनेक्शन असल्याची शक्यता दरम्यान काल येस बँक (Yes Bank) प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि मुंबईतील अनेक डीएचएफएल (DHFL) ठिकाणी छापे टाकले आहेत. सीएनएन न्यूज 18 च्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आणि दिल्लीतील अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांनी छापे टाकले आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने किमान सात ठिकाणी छापे टाकले असून यातील बहुतांश ठिकाणे मुंबईतील आहेत. सेनापती बापट मार्ग लोअर परेल येथील वन इंडियाबूल्स सेंटरमधील 7 व्या आणि 8 व्या मजल्यावर, विंग A मधील टॉवर 2 येथील 15 व्या मजल्यावर याशिवाय वरळी डॉ. ए.बी. रोड  नेहरु सेंटर येथील 8 व्या व 9 व्या मजल्यावर छापे मारण्यात आले आहे. संबंधित - राणा कपूरला दुसरा झटका, ED नंतर आता CBI नेही दाखल केला गुन्हा सीबीआय डीएचएफएलचे अध्यक्ष कपिल वाधवन यांची तपासणी करण्यास तयार आहे. येस बँकेचे सह संस्थापक राणा कपूर यांना लाच दिल्याचा आरोप कपिल यांच्यावर आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Rbi orders, Yes bank

    पुढील बातम्या