येस बॅंक घोटाळ्यात नवा खुलासा, राणा कपूर आणि प्रियंका गांधींचं कनेक्शन असल्याची शक्यता

येस बॅंक घोटाळ्यात नवा खुलासा, राणा कपूर आणि प्रियंका गांधींचं कनेक्शन असल्याची शक्यता

राणा कपूर यांच्या तपासानंतर महत्त्वपूर्ण खुलासा झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 08 मार्च : येस बँकेवर (Yes Bank Crisis) सरकारने आर्थिक निर्बंध लादल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. दीवान हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएचएफएल) च्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी  संचालनालयानं (ईडी) येस बँकेचे सीईओ राणा कपूर यांना रविवारी पहाटे अटक केली. ईडी अधिकार्‍यांनी सुमारे 20 तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक केली आहे.

या प्रकरणात नवीन खुलासा समोर आला आहे. या प्रकरणात येस बँकेचे सीईओ राणा कपूर आणि काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांचं काही कनेक्शन असल्याचा तपास आयकर विभागाकडून केला जात आहे.

राणा कपूर यांचा 'गांधींज'बरोबर संबंध असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी वाड़्रा यांची पेंटिग्स युपीए सरकारदरम्यान राणा कपूर यांनी 2 कोटी रुपयांना खरेदी केल्याची माहिती 'द टाइम्स ऑफ इंडिया' या वृत्तसमूहाने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. राणा कपूर यांना अटक केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. राणा कपूर व प्रियंका गांधी यांच्यामध्ये झालेल्या या व्यवहाराचा तपास आयकर विभागाकडून करण्यात येत आहे. या पेंटिग्स खरेदी करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

काँग्रेस पक्षाकडून स्पष्टीकरण

प्रियंका गांधी आणि येस बँकेच्या राणा कपूर यांच्यामध्ये झालेल्या व्यवहाराचा स्वीकार काँग्रेस पक्षाने केला आहे. मात्र पक्षाने या दोघांमध्ये कनेक्शन वा लिंक असल्याचा नकार दिला आहे. याप्रकरणात पक्षाचे नेते राशिद अल्वी यांनी सांगितले, 'यामुळे काय होईल? जर प्रियंका गांधी कोणतीही वस्तू विकतात आणि दुसरा कोणी खरेदी करीत असले तर खरेदी करणाऱ्याला पाहिलं जात नाही. जो पैसे देतो तो खरेदी करतो. जर नरेंद्र मोदींना ही पेंटिग्स हवी असती तर त्यांनी ती खरेदी केली असती.'

भाजपकडून आरोप-प्रत्यारोप

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सांगितले, 'भारतातील प्रत्येक आर्थिक घोटाळा ‘गांधीज’शी जोडला गेलेला आहे. विजय माल्या सोनिया गांधींच्या हवाई तिकीट अपग्रेड करीत होता. राहुल गांधींनी नीरव मोदीच्या ज्वेलरी कलेक्शनचे उद्घाटन केलं होते. राणाने प्रियंका गांधींची पेटिंग्स खरेदी केली आहे'.

First published: March 8, 2020, 1:31 PM IST

ताज्या बातम्या