जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / ...तर घराबाहेर न पडताही तुम्हाला कोरोना संसर्ग होऊ शकतो; डॉक्टरांनी केलं सावध

...तर घराबाहेर न पडताही तुम्हाला कोरोना संसर्ग होऊ शकतो; डॉक्टरांनी केलं सावध

शरीरावर  बॅक्टेरियाचा हल्ला झाला तर लढण्याची ताकद कमी होते. त्यामुळे मीठ प्रमाणात खावं. जास्त प्रमाणात मीठ खाल्याने ग्लुकोकोर्टिकॉइडच्या पातळीतही वाढ होऊ शकते.

शरीरावर बॅक्टेरियाचा हल्ला झाला तर लढण्याची ताकद कमी होते. त्यामुळे मीठ प्रमाणात खावं. जास्त प्रमाणात मीठ खाल्याने ग्लुकोकोर्टिकॉइडच्या पातळीतही वाढ होऊ शकते.

घराबाहेर न पडतानाही अनेकांना कोरोना झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत. यामागे नेमकं काय कारण आहे, याचं उत्तर तज्ज्ञांनी दिलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 23 एप्रिल : कित्येक दिवस तरी मी अगदी घराचा उंबरठाही ओलांडला नाही. घराबाहेर बिलकुल बाहेर पडले नाही. तरी मला कोरोना (Coronavirus) कसा झाला? हा प्रश्न सर्व काळजी घेऊनही तुम्हाला कोरोना झाल्यावर तुमच्या मनात आलाच असेल नाही का? सर्वसामान्य सोडा अगदी सेलिब्रिटीसुद्धा. ज्यांच्या घरातच सर्व सोयीसुविधा असतात त्यांनासुद्धा घरात राहूनही कोरोनाने (Corona infection in home) गाठलंच. असं का? यामागे नेमकं काय कारण आहे? दिल्लीतील एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Dr Randeep guleria) यांनी तुमच्या-आमच्या मनातील या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. घरात राहून, सर्व काळजी घेऊनही कोरोना का होतो याचं त्यांनी कारण दिलं आहे. डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं, “कोरोनाचा संसर्ग हवेतूनही होतो. संसर्गित व्यक्तीच्या नाकातल्या स्रावातून, ड्रॉपलेट्समधून पसरतो, हे लक्षात घ्यायला हवं. गेल्या सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ यावर चर्चा सुरू आहे, की कोरोना कसा पसरतो. माझ्या मते कोरोना हा पृष्ठभाग आणि हवा अशा दोन्ही माध्यमातून पसरतो. सुरुवातीला ड्रॉपलेट (Droplet) थिअरीवर भर दिला गेला होता. शिंकण्या-खोकण्यातून बाहेर आलेले ड्रॉपलेट्स पृष्ठभागावर पडून, तिथून इन्फेक्शन पसरत होतं. त्यामुळे सुरुवातीला पृष्ठभाग डिसइन्फेक्ट केले जात होते. पण गेल्या काही महिन्यांमधल्या अभ्यासातून असं स्पष्ट झालं आहे, की एअरोसोल्स (Aerosols) अर्थात पाच मायक्रॉनपेक्षा लहान आकाराच्या कणांद्वारेही तो पसरू शकतो. हे कण हवेत जास्त काळ राहू शकतात” हे वाचा -  घरीच कोरोनावर उपचार घेताना शरीरातील Oxygen कमी झाल्यास काय करावं? पाहा हा VIDEO “एखादी खोकणारी-शिंकणारी व्यक्ती खोलीत तुमच्यापासून दोन मीटर अंतरावर असेल आणि तुम्ही त्या व्यक्तीच्या जवळून गेलात, तर तुम्हाला संसर्ग होऊ शकतो. म्हाताऱ्या व्यक्ती घराबाहेर पडत नसतील. पण बाहेरून येणाऱ्या व्यक्ती उदा. घरकाम करणारी स्त्री, काही तरी दुरुस्तीसाठी येणारा मेकॅनिक आदी व्यक्तींमध्ये लक्षणं दिसत नसली, तरी ते कोरोनाचे वाहक असू शकतात. ते घरात येऊन संसर्ग पसरवू शकतात”, असं गुलेरिया म्हणाले. हे वाचा -  बापरे! देशात 35 लाख अ‍ॅक्टिव्ह रुग्ण होणार, आयआयटी वैज्ञानिकांचा अंदाज “त्यामुळे टेस्ट निगेटिव्ह आलेल्या व्यक्तींव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तींच्या संपर्कात तुम्ही येणार असाल, तर त्या सर्व व्यक्ती कोरोना पॉझिटिव्हच आहेत, असं समजूनच वागायला हवं. शारीरिक अंतर, मास्क घालणं, हातांची स्वच्छता या उपायांचा कायम अवलंब करायला हवा. घरातली हवा खेळती राहणंही गरजेचं आहे. त्यासाठी खिडक्या उघड्या ठेवायला हव्यात. कारण त्यामुळे घरातल्या हवेत चुकून संसर्ग पसरला असेलच, तर तो बाहेर जाऊ शकतो”, असा सल्ला डॉ. गुलेरिया यांनी दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात