या राज्याने केला रेकॉर्ड; कोरोनाला रोखण्यासाठी तब्बल 4.85 कोटी नागरिकांची वैद्यकीय तपासणी

या राज्याने केला रेकॉर्ड; कोरोनाला रोखण्यासाठी तब्बल 4.85 कोटी नागरिकांची वैद्यकीय तपासणी

कोरोनाला रोखण्यासाठी योग्य वेळेत नागरिकांची तपासणी होणं आवश्यक आहे. त्यासाठी या राज्याने पाऊले उचलली आहेत.

  • Share this:

लखनऊ, 3 जून : सध्या देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यात कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. महाराष्ट्रात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय आहे. त्याशिवाय बिहार, उत्तर प्रदेश या राज्यात परतलेल्या मजुरांमुळे तेथील रुग्णसंख्याही वाढली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने नवीन विक्रम केला आहे. हा रेकॉर्ड कोविड – 19 च्या वैद्यकीय तपासणीबाबत करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत राज्यात 4.85 कोटी लोकांची कोरोना विषाणूची तपासणी करण्यात आली आहे, जो एक विक्रम आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की,  कोरोनाच्या वैद्यकीय तपासणीसाठी यूपीच्या आरोग्य विभागाच्या पथकांनी 78 लाखाहून अधिक घरे गाठली. आणि नागरिकांची स्क्रिनिंग करण्यात आली. राज्यात आतापर्यंत 4.85 कोटी लोकांची स्क्रिनिंग करण्यात आली आहे.

स्क्रीनिंगसाठी 1 लाख टीम

एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, लोकांच्या तपासणीसाठी राज्यात आरोग्य विभागाच्या एक लाखाहून अधिक पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही टीम  डोर-टू-डोअर स्क्रिनिंग करत आहेत. ते म्हणाले, वैद्यकीय टीममध्ये आशा (मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कर्मचारी) सेविकांचादेखील समावेश आहे.

देखरेख समितीही कार्यरत

कोरोना संशयितांच्या देखरेखीसाठी आणि विलगीकरण केंद्रांवर देखरेख ठेवण्यासाठी गावपातळीवर समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. समित्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना गाव पातळीवरील विकासाची माहिती दिली आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची तपासणीत मदत केली.

हे वाचा-मुंबईचा धोका टळला; चक्रीवादळाची दिशा आता पनवेल, कर्जत, खोपोली, नाशिक मार्गे

फडणवीसांचा आरोप ठरला फुसका बार, पुणे पालिकेनंही दिली होती PFI संघटनेला परवानगी

हजार रुपयांचं औषध दीड लाखाला; अमेरिकेत अडकलेल्या भारतीयांचे धक्कादायक अनुभव

First published: June 3, 2020, 4:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading