मराठी बातम्या /बातम्या /देश /

Lal Bahadur Shastri Death Anniversary: शास्त्रींच्या निधनाआधी नेमकं काय घडलं? मृत्यूचं गूढ आजही कायम

Lal Bahadur Shastri Death Anniversary: शास्त्रींच्या निधनाआधी नेमकं काय घडलं? मृत्यूचं गूढ आजही कायम

लाल बहादूर शास्त्री यांचं 11 जानेवारी 1966 रोजी उझबेकिस्तानमधील ताश्कंद (Tashkent) येथे निधन झालं. शास्त्रींच्या मृत्यूचा तपास करण्याचा भारत सरकारनं अनेकदा प्रयत्न केला

लाल बहादूर शास्त्री यांचं 11 जानेवारी 1966 रोजी उझबेकिस्तानमधील ताश्कंद (Tashkent) येथे निधन झालं. शास्त्रींच्या मृत्यूचा तपास करण्याचा भारत सरकारनं अनेकदा प्रयत्न केला

लाल बहादूर शास्त्री यांचं 11 जानेवारी 1966 रोजी उझबेकिस्तानमधील ताश्कंद (Tashkent) येथे निधन झालं. शास्त्रींच्या मृत्यूचा तपास करण्याचा भारत सरकारनं अनेकदा प्रयत्न केला

नवी दिल्ली 11 जानेवारी : सीमेवरील जवान आणि शेतात कष्ट करणारे शेतकरी हे दोघेही स्वतंत्र भारतासाठी सारखेच महत्त्वाचे आहेत, याची जाणीव माजी पंतप्रधान दिवंगत लाल बहादुर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांनी आपल्याला करून दिली. शास्त्री स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान (Prime Minister) होते. 'साधी राहणी आणि उच्च विचारसरणी' या उक्तीचं आयुष्यभर पालन करणाऱ्या शास्त्रींनी 1965च्या युद्धात पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं होतं. मात्र, युद्ध हे वादावर कायमस्वरूपीचं उत्तर नाही याची जाणीव असलेल्या शास्त्रींनी प्रसंगी वाटाघाटी करण्यासाठीही तयारी दर्शवली होती.

वाटाघाटीच्या चर्चेदरम्यानच लाल बहादूर शास्त्री यांचं 11 जानेवारी 1966 रोजी भारतापासून दूर असलेल्या उझबेकिस्तानमधील (तत्कालीन सोव्हिएत युनियनमधील प्रदेश) ताश्कंद (Tashkent) येथे निधन झालं. शास्त्रींच्या मृत्यूचा तपास करण्याचा भारत सरकारनं अनेकदा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूचं गूढ (Mysterious death) आजही पूर्णपणे उकललेलं नाही. आज त्यांची पुण्यतिथी (Death Anniversary) आहे. दैनिक भास्करनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

27 मे 1964 रोजी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांचं आकस्मिक निधन झालं. त्यानंतर भारताच्या राज्य कारभाराची धुरा लाल बहादूर शास्त्री यांच्या हाती देण्याचा निर्णय घेण्यात आला. 9 जून 1964 रोजी शास्त्रींनी देशाचे दुसरे पंतप्रधान म्हणून लोकसभेत (Loksabha) शपथ घेतली. आपल्या 18 महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी देशात दूध उत्पादन वाढवण्यासाठी राष्ट्रीय मोहीम सुरू केली. ज्याला 'धवल क्रांती' म्हणून ओळखलं जातं. यासोबतच त्यांच्या कार्यकाळात ‘हरितक्रांती’च्या (Green Revolution) माध्यमातून देशात अन्नधान्याचं उत्पादन वाढवण्यात आलं. यावेळीच त्यांनी 'जय जवान, जय किसान'ही (Jai Jawan, Jai Kisan) घोषणा दिली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतानं 1965 च्या युद्धात पाकिस्तानचा (1965 Indo Pak war) पराभव केला होता.

प्राचीन गडावरील खजिना चोरांनी केला लंपास; 100 वर्षांपासून बंद होती ती गुप्त खोली

1965 मध्ये पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामानंतर, पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री सोव्हिएत युनियनचा भाग असलेल्या उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे गेले होते. निमित्त होतं भारत-पाकिस्तान शांतता कराराचं. त्याठिकाणी पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष अयुब खान (Ayub Khan) यांच्याशी करार होणार होता. 10 जानेवारी 1966 रोजी भारत आणि पाकिस्तानदरम्यान 'ताश्कंद करारा'वर (Tashkent Agreement) स्वाक्षरी झाली. या कराराच्या अवघ्या 12 तासांनंतर 11 जानेवारी रोजी पहाटे 1 वाजून 32 मिनिटांनी शास्त्रींचं निधन झालं. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात खळबळ उडणं अपेक्षित होतं. कारण एका देशाच्या पंतप्रधानाचा परदेशात अचानक मृत्यू झाला होता. मात्र, हे प्रकरण नाट्यमयरित्या शांत झालं होतं.

शास्त्रींच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांनी आणि त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींनी घातपाताची शक्यता व्यक्त केली होती. जाहीर केलेल्या माहितीनुसार, मृत्यूच्या अर्धा तास आधीपर्यंत शास्त्री एकदम ठणठणीत होते. केवळ 15 ते 20 मिनिटांतच त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना एक इंट्रा-मस्क्युलर इंजेक्शन (Intra-muscular injection) दिलं होतं. इंजेक्शन दिल्यानंतर काही मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाला.

विशेष म्हणजे त्यांचं पोस्टमॉर्टमसुद्धा (Post-mortem) केलं गेलं नाही. जेव्हा शास्त्रींचा पार्थिव देह कुटुंबियांकडे देण्यात आला तेव्हा त्याचा रंग काळानिळा झालेला होता, अशी माहिती त्यांचा मुलगा सुनील (Sunil Shastri) यांनी उघड केलेली आहे. या सर्व परिस्थितीमुळे लाल बहादुर शास्त्री यांच्यावर विषप्रयोग (Poisoning) झाला होता, असा दावा त्यांच्या पत्नी ललिता शास्त्री (Lalita Shastri) यांनी केला होता. एम. एल. वर्मा यांनी 1978मध्ये लिहिलेल्या 'ललिता के आँसू' या पुस्तकात ललितादेवींनी आपल्या पतीच्या दुःखद मृत्यूची गोष्ट सांगितलेली आहे.

लाल बहादूर शास्त्रींची पंतप्रधान म्हणून कारकीर्द कमी राहिली. मात्र, 18 महिन्यांच्या काळातदेखील त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. आंतरराष्ट्रीय राजकारणात त्यांना आदर मिळाला होता. जेव्हा शास्त्री यांचं पार्थिव शरीर भारतात पाठवण्यासाठी ताश्कंद एअरपोर्ट आणलं जात होतं तेव्हा सोव्हियत संघ, भारत आणि पाकिस्तानचे राष्ट्रध्वज अर्ध्यात उतरवण्यात आले होते. दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानासाठी पहिल्यांदाच दोन मोठ्या राष्ट्रांनी आपले राष्ट्रध्वज उतरवले होते. सोव्हियतचे पंतप्रधान अलेक्सी कोसिजिन (Alexei Kosygin) आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांनी स्वत: भारतीय पंतप्रधानांच्या पार्थिवाला खांदा दिला होता.

भारतात छापण्यात आल्या होत्या शून्य रुपयांच्या नोटा, कारण आहे Interesting

आपली प्रचंड कार्यक्षमता, सचोटीनं काम करण्याची वृत्ती आणि नम्र स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या लाल बहादुर शास्त्री यांचा जन्म, 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशातील मुघलसराय (Mughalsarai) येथे झाला होता. त्यांनी मुघलसराय येथील ईस्ट सेंट्रल रेल्वे इंटर कॉलेज आणि वाराणसीच्या हरिश्चंद्र हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं. 1926 मध्ये त्यांनी काशी विद्यापीठातून पदवी मिळवली. पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर लाल बहादूर यांना 'शास्त्री' म्हटलं जाऊ लागलं. 'शास्त्री' या शब्दाचा अर्थ 'विद्वान' असा होतो.

लाल बहादूर खरोखरचं विद्वान होते. विविध विषयांचं त्यानं सखोल ज्ञान होतं. शास्त्रींच्या आयुष्यावर महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांचा मोठा प्रभाव होता. या प्रभावामुळेच 1920 मध्ये त्यांनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात उतरण्याचा निर्णय घेतला. गांधीजींनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात शास्त्रींनी सक्रिय सहभाग घेतला. यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगावासही भोगावा लागला. 1930मध्ये लाल बहादुर शास्त्रींनी गांधीजींच्या नेतृत्वात मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला त्यावेळी त्यांना दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात रहावं लागलं. 1942 मध्ये 'भारत छोडो' आंदोलनात भाग घेतल्यानंतरही त्यांना पुन्हा 1946 पर्यंत तुरुंगात राहावं लागलं. स्वातंत्र्यलढ्यात शास्त्रीजींनी एकूण नऊ वर्षे तुरुंगवास भोगला.

आज भारताचे माजी पंतप्रधान असलेल्या शास्त्रींची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त देशभरात आदरांजली वाहिली जात आहे.

First published:

Tags: Death anniversary