मुंबई, 10 जानेवारी: भारतात (India) काही वर्षांपूर्वी शून्य रुपयांच्या नोटा (Zero Rupee Notes) छापण्यात (Printed) आल्या होत्या आणि अनेकांकडे त्या होत्या. आपल्यापैकी अनेकांनी पूर्वीच्या काळात 1 रुपयाची, 2 रुपयाची आणि 5 रुपयाची नोट (1, 2 and 5 rupee notes) पाहिली असेल. काही वर्षांपूर्वीपर्यंत या नोटा चलनात होत्याच. सध्या दहा, वीस, पन्नास, शंभर, पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आहेत. नोटाबंदी होईपर्यंत एक हजार रुपयांच्या नोटाही चलनात होत्या, मात्र त्या बंद करण्यात आल्या. या सगळ्या नोटांमध्ये एक शून्य रुपयांची नोटदेखील होती, हे वाचून अनेकांना धक्का बसेल.
अशी होती नोट
इतर नोटा आणि शून्य रुपयांची नोट यात मूलभूत फरक हा होता ही शून्य रुपयांची नोट रिझर्व्ह बँकेनं छापलेली नव्हती. ती छापली होती तमिळनाडूतील एका स्वयंसेवी संस्थेनं. फिफ्थ पीलर नावाच्या या एनजीओनं अशा प्रकारे शून्य रुपयांच्या नोटा छापल्या होत्या आणि भ्रष्टाचाराविरोधातील लढाईसाठी प्रतीक म्हणून त्यांचा वापर केला होता.
भ्रष्टाचार आणि शून्य रुपये
भारतात भ्रष्टाचार ही काही केवळ आजची बाब नाही. गेल्या अनेक वर्षांपासून देशात भ्रष्टाचार फोफावला आहे. 2007 साली भ्रष्टाचाराविरोधात मोहिम राबवताना या एनजीओनं शून्य रुपयांच्या नोटा छापल्या आणि त्या सामान्य माणसांना वाटल्या. रेल्वे स्टेशन, बस स्टँड, रिक्षा स्टँड, गर्दीचे चौक अशा वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी जाऊन सामान्य माणसांना या नोटांचं वाटप करण्यात आलं. जर कुणी लाच मागितली, तर त्याला या नोटा देण्याचं आवाहन एनजीओनं केलं होतं.
हे वाचा -
अशी दिसते नोट
शून्य रुपयांच्या या नोटेवर एनजीओचं नाव लिहिण्यात आलं आहे. त्याच्यावर लिहिलं होतं, सर्व स्तरातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी. इतर नोटांप्रमाणेच या नोटेवरही महात्मा गांधींचा फोटो छापण्यात आला होता. लाच मागणार नाही आणि लाच देणारही नाही, असं या नोटेवर छापण्यात आलं होतं. त्यानंतर बरीच वर्षं या नोटा सामान्य माणसांकडे दिसत होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: History, Money, Tamil nadu