मराठी बातम्या /बातम्या /देश /राज्यात पेट्रोल होणार स्वस्त? पवारांना कोरेगाव भीमा प्रकरणी समन्स.. देशविदेशातील TOP बातम्या

राज्यात पेट्रोल होणार स्वस्त? पवारांना कोरेगाव भीमा प्रकरणी समन्स.. देशविदेशातील TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

मुंबई, 28 एप्रिल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता सभेतून विरोधकांना उत्तर देणार आहेत. त्यांच्या सभेची तारीख ठरली आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी शरद पवारांना बजावला समन्स बजावले आहेत. तर आयएनएस विक्रांत घोटाळाप्रकरणी किरीट सोमय्या मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करण्याची शक्यता. पंतप्रधान मोदी यांच्या बैठकीनंतर राज्यात इंधन स्वस्त होण्याची शक्यता. देशविदेशातील बातम्या अवघ्या काही मिनिटांत.

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी शरद पवारांना बजावला समन्स

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात (Koregaon Bhima Case) चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना समन्स पाठवले आहे. पुढील महिन्यात  5 ते 7 मे दरम्यान शरद पवार यांचा जबाब नोंदवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिर करा

फडणवीसांनी खोडला मुख्यमंत्र्यांचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी थकीत जीएसटीबद्दल मुद्दा उपस्थितीत केला असून लवकरात लवकर द्यावी अशी मागणी केली आहे. तर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी राज्याला किती जीएसटी आतापर्यंत देण्यात आला आहे, याचा पुरावाच जाहीर केला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिर करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेची तारीख ठरली

गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजपकडून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल सुरू आहे. खास करून राज ठाकरे (raj thackery) यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून सभांचा धडाका लावला आहे. आता सभेला सभेतून उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) मैदानात उतरले आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिर करा

नवनीत राणांना ड्रामा पडणार भारी

हनुमान चालीसा पठण प्रकरणामुळे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या खासदार नवनीत राणा (Nanveet Rana) यांच्या अडचणीत आता चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी युसुफ लकडवालाकडून  (Yusuf Lakadawala) 80 लाखांचे कर्ज घेतल्याचा आरोप केला आहे. आता या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी दिले आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिर करा

सांगलीत संभाजी भिडे गुरुजींचा अपघात

शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचा सांगलीमध्ये अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. संभाजी भिडे गुरुजी सायकलवरून पडले आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिर करा

मोदींनी फटकारल्यानंतर राज्यात पेट्रोल होणार स्वस्त?

पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol diesel price hike) दरात भरमसाठ वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी राज्य सरकारने व्हॅट कमी करावी अशी सूचना राज्य सरकारला दिली आहे. आता त्यानंतर पेट्रोलच्या दरात 1 रुपये कपात करण्याचा निर्णय राज्य सरकार घेण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिर करा

सहा वर्षाच्या मुलांना इयत्ता पहिलीत प्रवेश मिळणार

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली वर्गात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याचं वय सहा वर्ष पूर्ण असलंच पाहिजे, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिर करा

आयएनएस विक्रांत घोटाळाप्रकरणी किरीट सोमय्या मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करण्याची शक्यता.

मुंबई उच्च न्यायालयात 2018 च्या भीमा कोरेगाव खटल्यातून मुक्त होण्यासाठी आरोपी ज्योती जगताप हिने अर्ज दाखल केला आहे. तसेच आणखी काही आरोपी आहेत ते 2018 च्या भीमा कोरेगाव खटल्यातून मुक्त होण्यासाठी अर्ज दाखल करणार आहेत.

श्रीलंकेत सरकारविरोधात रस्त्यांवर जनक्षोभ

श्रीलंकेत 9 एप्रिलला हजारो निदर्शक रस्त्यावर उतरले. महत्त्वाच्या आयातीसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. जीवनावश्यक वस्तूंच्या गगनाला भिडलेल्या किमती आणि इंधन, औषधे आणि विजेच्या पुरवठ्यात तीव्र टंचाई हे यामागचं कारण आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिर करा

चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार

सुमारे 20 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या बीजिंगमधील (Beijing) अनेक निवासी भागात लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आला आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटी मोठ्या संख्येनं रुग्णांची नोंद झाल्यानंतर, या आठवड्यात तीन वेळा शाओयांग जिल्ह्याची कोविड चाचणी करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

First published:

Tags: Top news india, Top news maharashtra