चीनमध्ये कोरोना व्हायरसने (corona virus) पुन्हा एकदा धुमाकुळ घातला आहे. शांघाय (shanghai) या सर्वांत मोठ्या शहराला कडक लॉकडाऊन लावला आहे. तर संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूच्या दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. भीती इतकी पसरली आहे की, बीजिंगच्या काही भागात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. सर्वांना कोविड चाचणी (covid test) अनिवार्य करण्यात आली आहे.
चीनमधील शांघायमध्ये कोरोनामुळे एकूण 87 लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यांचं सरासरी वय सुमारे 81 वर्षे होते. वृत्तसंस्था शिन्हुआने महानगरपालिका आरोग्य आयोगाच्या हवाल्यानं म्हटलंय आहे की, मृतांपैकी सर्वांत ज्येष्ठ 101 वर्षांचे होते.
चीन आपले 'झिरो कोविड धोरण' अजिबात शिथिल करण्याच्या मनस्थितीत नाही. लॉकडाऊन बराच काळ चालू राहू शकतं. अशा परिस्थितीत लोक जीवनावश्यक वस्तू आणि खाद्यपदार्थांचा साठा भरत आहेत. त्यामुळे बहुतांश दुकाने रिकामीच आहेत.
शुक्रवारी शांघायमध्ये लॉकडाऊनमध्ये काही शिथिलता होती. यानंतर लोक पूर्ण सावधगिरीने वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात पोहोचले. एएफपी व्हिडिओमध्ये बीजिंगमधील दुकाने आणि रस्त्यावर लोकांची प्रचंड गर्दी दिसून आली.
इतर चित्रांमध्ये, लॉकडाऊन भागातील दुकानांमध्ये शांतता दिसून येते. बीजिंगमध्ये पसरलेल्या या भीतीची मुळे शांघायशी संबंधित आहेत जिथे पाच आठवड्यांच्या लॉकडाऊननंतरही मृत्यू सतत वाढत आहेत.
चीनमधील कोरोनाचा आकडा पूर्ण आठवडाभर 1000 च्या खाली राहिला. मार्चमध्ये येथे मोठ्या प्रमाणावर कोरोना संसर्गाची प्रकरणे नोंदवली गेली. एका दिवसात येथे 70,000 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली. याशिवाय चीनच्या जिलिन प्रांतासह इतर अनेक शहरांमध्ये कोविड-19 चा झपाट्याने प्रसार सुरू आहे.