मराठी बातम्या /बातम्या /देश /राणा दाम्पत्याच्या जामीना वर सुनावणी, तेज प्रताप देणार RJD चा राजीनामा.. देशविदेशातील TOP बातम्या

राणा दाम्पत्याच्या जामीना वर सुनावणी, तेज प्रताप देणार RJD चा राजीनामा.. देशविदेशातील TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

मुंबई, 26 एप्रिल : विरोधकांच्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आम्हाला दादागिरी कशी मोडायची हे माहितीय, असं ठाकरे म्हणाले. राणा दाम्पत्याच्या जामीनावर सुनावणी होणार आहे. तर वकील सदावर्ते यांच्या कोठडीवरही मुंबईत सुनावणी होणार आहे. दरम्यान, लालू यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप RJD चा राजीनामा देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या अवघ्या काही मिनिटांत.

दादागिरी कशी मोडायची हे आम्हाला माहितीय : मुख्यमंत्री ठाकरे

'हनुमान चालीसा तुमच्या घरात नीट म्हणण्याची संस्कृती नसेल किंवा पद्धत नसेल तर या आमच्या घरी या बोलायची असेल तर जरूर बोला. त्याला एक पद्धत असते. साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा, पण आमच्या घरी साधू संत येतच असतात. शिवसेनाप्रमुख होते तेव्हा येत होते. ते सांगून यायचे. पण जर दादागिरी करून याल तर आम्हाला दादागिरी कशी मोडायची हे आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी शिकवलंय' असं म्हणत पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackery) यांनी हनुमान चालीसा वादावर भाष्य केलं.

मनसेसोबत युती नाही : चंद्रकांत पाटील

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत सभांचा धडाका लावला आहे. त्यामुळे भाजप आणि मनसेची युती (BJP and MNS alliance) होईल अशी चर्चा रंगली आहे. मात्र, 'राज ठाकरे भविष्यातील मित्र असतील अशी आता काही शक्यता नाही. त्यांच्यासोबत युतीचा निर्णय राष्ट्रीय कार्यकारणी घेतील, पण आता युतीचा विषय नाही' असं स्पष्ट उत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी दिलं.

आदित्य ठाकरे दिल्लीत

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पर्यावरण परिषदेसाठी दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते त्यांच्या भेटीत MVA राजकीय नेत्यांना भेटू शकतात.

राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सुनावणी

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या जामीन अर्जावर मुंबईत सुनावणी होणार आहे. त्यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सदावर्ते यांच्या कोठडीवर सुनावणी

सिल्वर ओक हल्ला प्रकरणात आरोपी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या कोठडीवर मुंबईतील गिरगाव न्यायालयात सुनावणी आहे. सध्या सदावर्ते हे अजून एका प्रकरणात कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आहेत.

महाराष्ट्रात 'दादा बुलडोजर'

उत्तर प्रदेशमध्ये (uttar pradesh) अनधिकृत काम करणाऱ्या आणि गुंडगिरी करणाऱ्या लोकावर थेट बुलडोजर चालवून (bulldozer baba) कारवाई केली जात आहे. आता हाच पॅटर्न नाशिक (nashik)  जिल्ह्यातील मालेगावच्या झोडगे येथे पाहण्यास मिळाला आहे. मतदारसंघात सुरू असलेले अवैध धंद्याचे अड्डे बंद  करण्यासाठी कृषिमंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांनी जेसीबीच्या (jcb machine) माध्यमातून जुगार अड्डे उद्ध्वस्त (gambling den) केले आहे.

नीरव मोदीचा निकटवर्तीय सुभाष परब यांच्या कोठडीवर सुनावणी

इजिप्त देशातील कैरो शहरात अटक करण्यात आलेला फरारी हिरे व्यापारी नीरव मोदीचा निकटवर्तीय असलेला सुभाष शंकर परब यांच्या कोठडीवर मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी. पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) कर्ज फसवणूक प्रकरणात सीबीआयने त्यांना अटक केली होती.

हिजाबनंतर आता नवा वाद

कर्नाटकातही आता बायबलवरून वाद (New Controversy On Bible) सुरु झाला आहे. याआधी हिजाबवरून वाद (Hijab Controversy) निर्माण झाला होता आणि त्यामुळे देशातलं वातावरण ढवळून निघालं होतं हे आपल्याला माहिती आहे. बंगळुरुतील क्लेरेन्स हायस्कूलच्या व्यवस्थापनानं (Clerens High School Management) बायबलसंबंधी एक आदेश काढला आहे. शाळेत मुलांनी बायबल ग्रंथ आणणं बंधनकारक आहे असा नवा आदेश आता देण्यात आला आहे. त्यामुळे हिंदू संघटनांनी आता याचा विरोध करायला सुरूवात केली आहे. या बद्दलचं वृत्त दैनिक भास्करमध्ये देण्यात आलं आहे.

लालू यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप RJD चा राजीनामा देणार

लालू यादव यांचे ज्येष्ठ पुत्र आणि बिहारचे माजी आरोग्यमंत्री तेज प्रताप यादव हे त्यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दलावर (आरजेडी) नाराज झाले आहेत. त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचा (आरजेडी) राजीनामा देणार असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली आहे. सोमवारी संध्याकाळी उशिरा तेज प्रताप यादव यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर सांगितले की, त्यांनी राजदचा राजीनामा देणार आहे.

LIC चा IPO 4 मे रोजी होणार लाँच

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच LIC च्या मेगा IPO ची गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत होते अखेर त्याची प्रतिक्षा आता संपली आहे.  एलआयसीचा आयपीओ हा 4 मे रोजी लाँच केला जाणार आहे.

First published:

Tags: Top news india, Top news maharashtra