Home /News /maharashtra /

यूपीमध्ये 'बाबा' का बुलडोजर' नंतर महाराष्ट्रात 'दादा बुलडोजर', शिवसेनेच्या मंत्र्याने केला जुगार अड्डा जमीनदोस्त!

यूपीमध्ये 'बाबा' का बुलडोजर' नंतर महाराष्ट्रात 'दादा बुलडोजर', शिवसेनेच्या मंत्र्याने केला जुगार अड्डा जमीनदोस्त!

ग्रामस्थांनी गावात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यामुळे तरुण पिढी बरबाद होत असल्याची तक्रार केली.

झोडगे, 25 एप्रिल : उत्तर प्रदेशमध्ये (uttar pradesh) अनधिकृत काम करणाऱ्या आणि गुंडगिरी करणाऱ्या लोकावर थेट बुलडोजर चालवून (bulldozer baba) कारवाई केली जात आहे. आता हाच पॅटर्न नाशिक (nashik)  जिल्ह्यातील मालेगावच्या झोडगे येथे पाहण्यास मिळाला आहे. मतदारसंघात सुरू असलेले अवैध धंद्याचे अड्डे बंद  करण्यासाठी कृषिमंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांनी जेसीबीच्या (jcb machine) माध्यमातून जुगार अड्डे उद्ध्वस्त (gambling den) केले आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे आपल्या निर्णयामुळे कायम चर्चेत असतात. आज दादा भुसे यांचा आक्रमकपणा मनमाडकरांना पाहण्यास मिळाला. मतदारसंघात वाढलेल्या अवैध धंद्यावर आळा बसविण्यास पोलीस अपयशी ठरल्याचे पाहून राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे कमालीचे संतापले होते. त्यामुळे त्यांनी अवैध धंद्यांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली. आज त्यांनी मतदारसंघाच्या झोडगे येथे जेसीबी लावून जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त केला. (UPSC Tips: तुम्हालाही IAS व्हायचंय? मग 'हे' महत्त्वाचे गुण तुमच्यामध्ये आहेत ना?) भुसे आज झोडगे येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी ग्रामस्थांनी गावात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यामुळे तरुण पिढी बरबाद होत असल्याची तक्रार केली. या तक्रारीची तातडीने दखल घेऊन जेसीबीने जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त केला. मतदारसंघात कुठे ही अवैध धंदे सुरू असतील तर तर जेसीबीने उद्ध्वस्त केले जातील असा इशारा भुसे यांनी दिला. (आतापर्यंत ज्यांना कोरोनाची लागण झाली नाही, अशांसाठी चिंताजनक वृत्त!) त्यामुळे अतिक्रमणावर बुलडोजर चालवून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे बुलडोजर बाबाच्या नावाने प्रसिद्ध झालेले आहे. त्या पाठोपाठ आता राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे हे अवैध अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी जेसीबी घेऊन फिरत असल्यामुळे आगामी काळात ते देखील 'जेसीबी बाबा' म्हणून ओळखले  जातील असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

तुमच्या शहरातून (नाशिक)

Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या