Home /News /national /

देशात भोंगे प्रकरण पेटलं, शिवसेना आमदाराच्या पत्नीची आत्महत्या.. देशविदेशातील TOP बातम्या एका क्लिक वर

देशात भोंगे प्रकरण पेटलं, शिवसेना आमदाराच्या पत्नीची आत्महत्या.. देशविदेशातील TOP बातम्या एका क्लिक वर

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

    मुंबई, 18 एप्रिल : शिवसेना आमदार मंगेश कुडाळकरांच्या पत्नीची राहत्या घरी आत्महत्या. एकीकडे मंत्री नवाब मलिक यांची न्यायालयीन कोठडी संपणार तर दुसरीकडे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचीही पोलीस कोठडी संपणार आहे. दरम्यान, देशभर सध्या भोंगे प्रकरण पेटलं आहे. दिल्लीतील हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी अनेकांना अटक केली आहे. यासह देशविदेशातील महत्वाच्या बातम्या अवघ्या काही मिनिटांत वाचा. शिवसेना आमदार मंगेश कुडाळकरांच्या पत्नीची राहत्या घरी आत्महत्या शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) यांच्या पत्नी रजनी मंगेश कुडाळकर (Rajni Kudalkar) यांनी आज गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. रजनी यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. मंगेश कुडाळकर हे कुर्ला (Kurla) विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मंगेश यांच्या पत्नी रजनी यांच्या आत्महत्येची बातमी समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मलिक, सदावर्ते यांची कोठडी संपणार एकीकडे मंत्री नवाब मलिक यांची न्यायालयीन कोठडी संपणार तर दुसरीकडे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची देखील चार दिवसांची पोलीस कोठडी संपणार आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले जाईल. राजकीय दौरे पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवस गुजरात दौऱ्यावर शाळेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड औरंगाबाद दौऱ्यावर राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व सुरू कोल्हापूर लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व सुरू, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार  मालोजीराजे  छत्रपती, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या उपस्थितीत शुभारंभ होईल. नवी मुंबई गणेश नाईकवर गुन्हा दाखल, अटक होण्याची शक्यता भाजप आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली आहे. गणेश नाईक यांच्याविरोधात एका महिलेने नेरळ पोलीस ठाणे (Neral Police Station) आणि राज्य महिला आयोगाकडे (Maharashtra Women Commission) तक्रार केली होती. या तक्रारीत महिलेने गणेश नाईक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करणे आणि त्यातून जन्माला आलेल्या अपत्याचा स्वीकार न करणे. तसेच पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी देणे, अशाप्रकारचे गंभीर आरोप महिलेने केले आहेत. महिलेच्या तक्रारीची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. गणेश नाईक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अटकेची देखील कारवाई केली जाईल, असं चाकणकर यांनी सांगितलं आहे. जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरण जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणी दोन मुख्य आरोपी अन्सार आणि अस्लम यांना सोमवारी रोहिणी न्यायालयात हजर केले जाणार आहे. जहांगीरपुरी प्रकरणी सलीम उर्फ ​​चिकना नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी न्यायालयाला सांगितले, की अन्सार आणि अस्लम यांनी कट रचला होता. जहांगीरपुरी हिंसाचारात 3 पिस्तुले 5 तलवारी जप्त, 24 तासात एकूण 20 जणांना अटक, 2 अल्पवयीन ताब्यात. हनुमान जयंती गालबोट हनुमान जयंती (Hanuman Jayanti) असतानाच देशातील अनेक राज्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहेत. काल कर्नाटकातही (Karnataka) जमावाने दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. कर्नाटकातील हुबळी (Hubli, Karnataka) येथील जुन्या हुबळी पोलीस स्टेशनवर जमावाने दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एका निरीक्षकासह 4 पोलीस जखमी झाले आहेत. पोलीस आयुक्त लभु राम यांनी सांगितलं की, संपूर्ण शहरात कलम 144 (Section 144) लागू करण्यात आलं आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. दगडफेक नियोजित सीएनएन न्यूज 18 मशिदीच्या छतावर गेली असता येथील व्हेंटिलेशन खिडक्या बंद होत्या आणि छतावर दगड आणि विटांचा मोठा साठा दिसत होता. याचा अर्थ दगडफेक नियोजित होती आणि त्यामुळे मशिदीतून दगडफेक करणार्‍या लोकांनी आधीच सुरक्षेचे उपाय केले होते. भारताची सुरक्षा बैठक युक्रेनमधील युद्ध 54 व्या दिवसात प्रवेश करत असताना भारताच्या सुरक्षा परिस्थितीवर त्याचा परिणाम यावर चर्चा करण्यासाठी भारताचे सर्वोच्च कमांडर बैठक घेत आहेत. तसेच आर्मी कमांडर्स कॉन्फरन्सच्या अजेंड्यावर एलएसीचा संपूर्ण सुरक्षा आढावा आहे, जिथे चीनसोबतची अडचण आता 2 वर्षांपासून सुरू आहे. बातमी युद्धभूमीतून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की त्यांचा देश रशियाशी युद्ध संपवण्यासाठी पूर्वेकडील प्रदेश सोडणार नाही. युक्रेनच्या पंतप्रधानांनी सांगितले की, वॉशिंग्टनमध्ये या आठवड्यात होणार्‍या आयएमएफ आणि जागतिक बँकेच्या बैठकीत देश आर्थिक मदतीची मागणी करेल. रशियन सैन्याने इशारा दिला आहे की युक्रेनियन सैन्याने वेढा घातलेल्या मारिओपोल बंदरात आत्मसमर्पण करण्यास नकार दिला आहे. श्रीलंकेत नवीन मंत्रीमंड अध्यक्ष गोटाबाया राजीनामा देणार नसल्यामुळे आज नवीन मंत्रिमंडळ स्थापन होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. यात बहुतांश तरुण खासदारांचा समावेश असेल. अध्यक्ष गोटाबाया आणि पंतप्रधान महिंदा यांनी पद सोडण्यास नकार दिला आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Crime news, Pm modi, Raj thacarey, Russia Ukraine

    पुढील बातम्या