जाहिरात
मराठी बातम्या / देश / कोरोनाच्या संकटात RBIकडून आणखी एका बँकेवर कारवाई, ग्राहकांना पैसे काढण्यास बंदी

कोरोनाच्या संकटात RBIकडून आणखी एका बँकेवर कारवाई, ग्राहकांना पैसे काढण्यास बंदी

कोरोनाच्या संकटात RBIकडून आणखी एका बँकेवर कारवाई, ग्राहकांना पैसे काढण्यास बंदी

भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं कानपूरमधील पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर सक्त करावाई केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 12 जून : कोरोनाच्या महासंकटात नागरिकांवर आणखीन एक संकट ओढवलं आहे. (RBI) भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं कानपूरमधील पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर सक्त करावाई केली आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये असलेल्या पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेची कमकुवत आर्थिक स्थिती लक्षात घेता, नवीन कर्ज देणे आणि त्यावरील ठेवी स्वीकारण्यासाठी 6 महिने स्थगित केले आहेत. आरबीआयने यासंदर्भात 11 जूनला अधिकृष माहिती दिली आहे. खातेदारांना पैसे काढण्यासाठी बंदी RBI ने पीपल्स को ऑपरेटिव्ह सहकारी बँकेतील खातेधारकांना पैसे जमा करता येणार नाहीत किंवा काढताही येणार नाही. RBI बँकेनं 10 जूनला यासंदर्भात निवेदन जारी केलं आहे. लेखी परवानगीशिवाय बँकेत कोणतेही नवीन कर्ज देता येणार नाही किंवा जुन्या थकबाकीचं नूतनीकरण करता येणार नाही. याशिवाय बँक कोणतीही नवीन गुंतवणूक करू शकणार नाही किंवा नवीन ठेवी स्वीकारणार नाही. हे वाचा- तुम्हाला कळलंच नाही, 6 दिवसांत हळूहळू इतकं महाग झालं पेट्रोल या सूचना 10 जून रोजी बँक बंद झाल्यानंतर सहा महिने लागू होणार नाहीत. सहकारी बँकेचे बँकिंग परवाना रद्द केल्यामुळे ही सूचना घेऊ नये, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले. आपली आर्थिक स्थिती सुधारत नाही तोपर्यंत बँक निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय करणे सुरू ठेवेल. हे वाचा- आणखी एक भारतीय संस्था Corona वरची लस बनवणार; अमेरिकन कंपनीशी झाला करार हे वाचा- देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोना रिलिफ फंडातून मिळणार 7500 रुपये? संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात