नवी दिल्ली, 25 जून : इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांचं शुक्रवारी ट्विटर अकाउंट (Twitter Account) ब्लॉक करण्यात आलं होतं, या घटनेनंतर काही तासांतच काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्या ट्विटर अकाउंटवरही अशा प्रकारची कारवाई झाल्याची बाब त्यांनी शेअर केली आहे. शशी थरूर यांनी आपल्या अकाउंटबाबत माहिती देताना सांगितलं, की मी आयटी मंत्री असताना अशा प्रकारची कारवाई माझ्या ट्विटर अकाउंटरही करण्यात आली होती. एका गाण्याचा व्हिडीओ ट्विटरने आक्षेपार्ह ठरवत, माझ्या अकाउंटवर कारवाई केली होती.
Raviji, the same thing just happened to me. Clearly DMCA is getting hyperactive. This tweet has been deleted by @Twitter because its video includes the copyrighted BoneyM song"Rasputin": https://t.co/ClgP2OKV1o #DanceIsNotJihad pic.twitter.com/IqQD50WhaU
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) June 25, 2021
After process, a/c unlocked. https://t.co/TCeT8aGxV6
(वाचा - मोठी बातमी! Twitter ने रवि शंकर प्रसाद यांचं अकाउंट केलं ब्लॉक, तब्बल एका तासानं झालं सुरू )
दरम्यान, ट्विटरने जवळपास एका तासापर्यंत ट्विटर अकाउंट लॉक ठेवल्याचं रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं. यावर उत्तर देत ट्विटरने, रविशंकर प्रसाद यांनी अमेरिकेच्या डिजीटल मिलेनियम कॉपराईट अॅक्टचं (Digital Millennium Copyright Act) उल्लंघन केल्याचं सांगितलं. जवळपास एका तासानंतर रविशंकर प्रसाद यांचं अकाउंट अनलॉक करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी ट्विटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Vice President M Venkaia Naidu) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही महत्त्वाच्या नेत्याच्या पर्सनल ट्विटर अकाउंटवरील ब्लू टिक हटवली होती. वाद वाढल्यानंतर ट्विटरने उपराष्ट्रपतींच्या पर्सनल अकाउंटची ब्लू टिक पुन्हा सक्रीय केली.