Home /News /national /

कोरोना संकटात पत्नीचे दागिने विकून जावेदने ऑटोला बनवलं Ambulance, आता बलात्काराचा गुन्हा दाखल

कोरोना संकटात पत्नीचे दागिने विकून जावेदने ऑटोला बनवलं Ambulance, आता बलात्काराचा गुन्हा दाखल

Auto Ambulance Driver Javed Rape Accused : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑटो अॅम्ब्युलन्सने लोकांना मोफत रुग्णालयात पोहोचवणारा जावेद आता वादात सापडला आहे. जावेदवर एका महिलेने लग्नाचं आश्वासन देऊन बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पुढे वाचा ...
    भोपाळ, 10 मे : कोविडच्या दुसऱ्या लाटेत एका ऑटोरिक्षा ड्रायव्हरला बरीच प्रसिद्धी मिळाली होती. या ऑटो चालकाचं नाव जावेद (rape case on bhopal auto drive javed) असं होतं. जावेदने आपली ऑटो अॅम्ब्युलन्स बनवून अनेक रुग्णांना मोफत रुग्णालयात नेलं होतं. कोविड दरम्यान, जावेदची त्याच्या कामाबद्दल आणि पोलीस चालानबद्दल चर्चा झाली. मात्र, हा ऑटो चालक सध्या गंभीर आरोपांमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. जावेद (auto ambulance driver javed) याच्यावर एका महिलेनं बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. महिलेनं पोलिसांना सांगितलं की, जावेद तिच्या घराजवळ राहत होता आणि तो तिला पूर्वीपासून ओळखत होता. यादरम्यान दोघांची मैत्री झाली. सोबतच जावेदच्या घरी येणं सुरू झालं. यादरम्यान जावेदने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप महिलेनं केला आहे. लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. आता त्यानं लग्नाचा निर्णय मागे घेतला आहे. यानंतर पीडितेनं पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. हे वाचा - देशद्रोह कायद्यावर सुप्रीम कोर्टाने केंद्राकडे 24 तासांत मागितलं उत्तर, म्हणाले पोलिसांनी कलम 376 आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. यानंतर भोपाळमधल्या या ऑटोचालक जावेदच्या अडचणी वाढणार आहेत. तसेच, त्याच्या अटकेचीही शक्यता आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून जावेद फरार असून, त्याचा शोध लागलेला नाही. या महिलेने पोलिसांकडे न्यायाची मागणी केली आहे. आरोपी जावेद हा आधीच विवाहित आहे. हे वाचा - उन्हाच्या झळा झेलण्यासाठी तयार राहा! पुढील पाच वर्ष आणखी होणार तीव्र उन्हाळा कोण आहे हा जावेद? कोरोनाच्या काळात लोक एकमेकांना मदत करायला घाबरत होते, त्याच काळात अॅशबागमध्ये राहणारा ऑटोचालक जावेद याने लोकांना मदत केली. जावेदने स्वत:च्या ऑटोचं अॅम्ब्युलन्समध्ये रूपांतर केले होते. रुग्णांची माहिती मिळताच तो लोकांच्या मदतीसाठी धावून जात असे. दरम्यान त्याने अनेकांचे प्राण वाचवले. तसेच त्यांच्याकडून पैसे घेतले नाहीत. अभिनेता अक्षय कुमारनेही जावेदच्या या उपक्रमाचे कौतुक केले. ऑटोला अॅम्ब्युलन्समध्ये बदलण्यासाठी त्याला पत्नीचे दागिने विकावे लागले होते.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Covid cases, Rape

    पुढील बातम्या