Home /News /lifestyle /

Global Temperature Update: उन्हाच्या झळा झेलण्यासाठी तयार राहा! पुढील पाच वर्ष आणखी होणार तीव्र उन्हाळा

Global Temperature Update: उन्हाच्या झळा झेलण्यासाठी तयार राहा! पुढील पाच वर्ष आणखी होणार तीव्र उन्हाळा

सध्या असह्य अशा उष्म्याने सगळे जण वैतागले आहेत. कधी एकदा हा उन्हाळा संपतो, असं सर्वांना झालं आहे. तरी अद्याप जवळपास अख्खा मे महिना जायचा आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर उन्हाचा तडाखा कमी होईल खरा; मात्र आगामी वर्षात उन्हाळा आणखी तीव्र असण्याची शक्यता आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 10 मे: सध्या असह्य अशा उष्म्याने सगळे जण वैतागले आहेत. कधी एकदा हा उन्हाळा संपतो, असं सर्वांना झालं आहे. तरी अद्याप जवळपास अख्खा मे महिना जायचा आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर उन्हाचा तडाखा कमी होईल खरा; मात्र आगामी वर्षात उन्हाळा आणखी तीव्र (Global Temperature) असण्याची शक्यता आहे. जागतिक हवामानशास्त्र संघटना अर्थात World Meteorological Organization ने (WMO) तसा इशारा दिला आहे. यापूर्वी 2016 या वर्षात सर्वाधिक तापमानाचा (Unprecedented Heatwave in India) उच्चांक नोंदवला गेला होता. यामधला पुढचा उच्चांक 2022 ते 2026 या वर्षांपैकी किमान एखाद्या वर्षी तरी नोंदवला जाऊ शकतो, असा इशारा WMO ने दिला आहे. 2016 साली एल निनो (El Nino) ही घटना घडली होती. त्या वेळी पॅसिफिक महासागराच्या (Pacific Ocean) विषुववृत्तीय प्रदेशात सागराच्या पृष्ठभागाचं तापमान सरासरीपेक्षा जास्त असतं. त्यामुळे एकंदरीतच तापमानवाढ होते; मात्र 2021च्या सुरुवातीला आणि शेवटी, तसंच 2022मध्येही सागरी पृष्ठभागाचं तापमान थंड झाल्यामुळे ला-निना (La Nina) ही घटना घडल्याचे संकेत मिळाले. त्यामुळे जागतिक तापमान तुलनेने कमी झालं. WMOच्या म्हणण्यानुसार, हा तात्पुरता परिणाम असून, आता एल निनो घडल्यास त्याचा परिणाम लगेचच तापमानवाढ (Global Warming) होण्यात होईल. तसंच 2016मध्ये झालं होतं. अलीकडेच करण्यात आलेल्या अभ्यासातून असे संकेत मिळाले आहेत, की 2021-22मधली ला-निना ही घटना आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. पाच वर्षांच्या सरासरी अंदाजानुसार, एल निनो किंवा ला निना यांपैकी कोणत्याच घटनेला अनुकूल संकेत दिसत नाहीयेत. हे वाचा-शेतकऱ्यांना वादळाची भीती, कच्चेच आंबे काढले विक्रीला; या राज्यांमध्ये अलर्ट प्री-इंडस्ट्रियल बेसलाइन अर्थात औद्योगिकीकरण होण्यापूर्वीच्या (Pre Industrial Levels) काळातल्या संदर्भ पातळीच्या तुलनेत 2021मध्ये जगाचं तापमान 1.1 अंश सेल्सिअसने वाढलं आहे. WMOने दिलेल्या कठोर इशाऱ्यानुसार, संदर्भपातळीच्या तुलनेत तापमानवाढ 1.5 अंश सेल्सिअसने होण्याची शक्यता 2017 ते 2021 या काळात 10 टक्के होती, तर 2021पासूनच्या पुढच्या पाच वर्षांच्या काळात ती शक्यता 50 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. WMOचं प्रमुख हवामान केंद्र ब्रिटनमध्ये आहे. जगभरातले हवामानशास्त्रज्ञ आणि जगभरातल्या महत्त्वाच्या हवामान अंदाज यंत्रणा यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ब्रिटनमधल्या केंद्राने एक अहवाल तयार केला आहे. त्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, '2022 ते 2026 या काळातल्या प्रत्येक वर्षी पृष्ठभागाजवळचं वार्षिक सरासरी जागतिक तापमान औद्योगिकीकरणापूर्वीच्या तापमान पातळीच्या तुलनेत 1.1 अंश सेल्सिअस ते 1.7 अंश सेल्सिअसने अधिक असण्याची शक्यता आहे.' WMO चे सरचिटणीस प्रा. पेटेरी तालस यांनी सांगितलं, '1.5 अंश सेल्सिअस हा आकडा अचानक आलेला नाही. पृथ्वी आणि पृथ्वीवरची माणसं यांच्यासाठी हवामान अधिकाधिक घातक ठरत जाईल, याचा हा आकडा निदर्शक आहे.' तालस यांनी सांगितलं, की जोपर्यंत जगभरातल्या देशांतून हरितगृह वायूंचं उत्सर्जन (Green House Gas Emission) होत राहील, तोपर्यंत तापमान वाढत राहील, सागराच्या पृष्ठभागाचं तापमान वाढत राहील, समुद्र अधिकाधिक अ‍ॅसिडिक बनत जातील, समुद्रातला बर्फ आणि हिमनद्या वितळत राहतील, समुद्राची पातळी वाढत राहील आणि पृथ्वीवरचं हवामान अधिकाधिक तीव्र होत राहील. आर्क्टिक प्रदेशातलं उष्णतामान (Temperature Rise) वाढण्याचं प्रमाण खूपच जास्त आहे. आर्क्टिक प्रदेशात जे काही घडतं, त्याचा आपल्या सगळ्यांवर परिणाम होतो, असंही तालस यांनी स्पष्ट केलं. हे वाचा-जनतेला बसत आहेत महागाईचे चटके; गेल्या 10 वर्षांत डाळ, तांदूळ, खाद्यतेलाच्या किंमतीत `अशी` झाली वाढ यंदा भारताच्या अनेक भागांत उष्णतेच्या तीव्र लाटा अनुभवायला मिळाल्या. हवामानाच्या अशा टोकाच्या घटनांपासून जगाला वाचवायचं असेल, तर 1.5 अंश सेल्सिअस हा महत्त्वाचा आकडा आहे. पॅरिस करारानुसार सर्व देशांनी हरितगृह वायूंच्या जागतिक उत्सर्जनात मोठी घट करण्याची गरज आहे. या शतकातली जागतिक तापमानवाढ 2 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होऊ न देण्यासाठी हे आवश्यक आहे. तसंच, ही वाढ 1.5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होऊ न देण्याचे प्रयत्नही सुरूच ठेवणं आवश्यक आहे. 'कोणत्याही एका वर्षी तापमानवाढ 1.5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाली, तर ते पॅरिस कराराचं उल्लंघन ठरणार नाही. कारण तो करार दीर्घकालीन तापमानवाढीशी संबंधित आहे; मात्र यातून असं दिसून येत आहे, की आपण 1.5 अंश सेल्सिअस तापमानवाढ जास्त काळ राहू शकेल अशा परिस्थितीच्या अधिकाधिक जवळ जात आहोत,' असं ब्रिटनमधल्या हवामानशास्त्र केंद्रातले डॉ. लिऑन हरमॅन्सन यांनी सांगितलं. जागतिक तापमानवाढ तात्पुरत्या स्वरूपात 1.5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होण्याच्या घटना येत्या काही वर्षांत जास्त वेळा घडणार असल्याचं शास्त्रज्ञांनी यापूर्वीही सांगितलं होतं. ते यावरून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. या परिस्थितीचा वेगवेगळ्या देशांवर कसा परिणाम होईल हे पाहून त्या अनुषंगाने धोरणं ठरवण्यासाठी सर्व देशांच्या धोरणकर्त्यांना मार्गदर्शनाचीही गरज भासणार असल्याचं यावरून दिसून येतं. WMOच्या म्हणण्यानुसार, 1991 ते 2020शी तुलना करता आर्क्टिक खंडात (Arctic) उत्तर गोलार्धातल्या (Northern Hemisphere) आगामी पाच हिवाळी हंगामात तापमानात (Weather) होणारे बदल तीन पटींनी जास्त असतील. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्याचा परिणाम जगभरातल्या हवामानाच्या पॅटर्न्सवर होणार आहे. भारताने यंदा अनुभवलेल्या अनपेक्षित उष्णतेच्या लाटाही या दुष्परिणामांशीच निगडित असाव्यात, असा अंदाज आहे.
First published:

Tags: Climate change, Rise in temperatures, Summer

पुढील बातम्या