चारा घोटाळा! बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना जामीन, तरीही जेलमध्येच राहणार

चारा घोटाळा! बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना जामीन, तरीही जेलमध्येच राहणार

झारखंड हायकोर्टानं लालूप्रसाद यादव यांना जामीन मंजूर केला आहे.

  • Share this:

रांची, 9 ऑक्टोबर: बहुचर्चित चारा घोटाळ्याशी संबंधित चाईबासा ट्रेझरी प्रकरणात बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडीचे (RJD) अध्यक्ष लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांना जामीन मिळाला आहे. लालूप्रसाद यादव यांना जामीन मंजूर झाला असला तरी ते जेलमधून बाहेर येणार नाही. कारण ते दुमका कोषागार प्रकरणातील आरोपी आहेत.

हेही वाचा...सरकार बनवायचंय की सरकारी नोकर व्हायचंय? पासवान यांनीच सांगितला होता किस्सा

लालूप्रसाद यादव यांचे वकिलांनी दिलेली माहिती अशी की, झारखंड हायकोर्टानं लालूप्रसाद यादव यांना जामीन मंजूर केला आहे. त्यासाठी 2 लाख रुपये जमा करावे लागणार आहेत. मात्र, दुसरीकडे लालूप्रसाद यादव यांच्या जामीनला सीबीआयच्या (CBI) वकिलांनी कडाडून विरोध केला होता. तरी देखील लालूप्रसाद यादव यांचा जामीन अर्ज कोर्टानं मंजूर केला आहे.

सुमारे 950 कोटी रुपयांच्या चारा घोटाळा प्रकरणासह तीन वेगवेगळ्या केसमध्ये लालूप्रसाद यादव हे आरोपी आहेत. सप्टेंबर 2013 मध्ये चारा घोटाळा प्रकरणी दोषी आढळल्यानंतर लालू प्रसाद यादवांना अटक झाली होती. त्यानंतर  2014 मध्ये ते जामिनावर बाहेर आले. मात्र नंतर पुन्हा  23 डिसेंबर 2017 मध्ये लालू प्रसाद यादवांना चारा घोटाळ्याशी संबंधित आणखी एका प्रकरणात शिक्षा सुनावली गेली. त्यानंतर त्यांना बिरसा मुंडा जेल मध्ये पाठवण्यात आलं. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत.

हेही वाचा...सरकार बनवायचंय की सरकारी नोकर व्हायचंय? पासवान यांनीच सांगितला होता किस्सा

मात्र, लालू सध्या झारखंडच्या राजेन्द्र आयुर्विज्ञान संस्थान (रिम्स) मध्ये 23 डिसेंबर 2017 पासून ते भरती आहेत. काही महिन्यांपूर्वी कोरोना व्हाययसपासून वाचण्यासाठी त्यांना रिम्स संचालकांच्या बंगल्यात शिफ्ट केलं असल्याची माहिती आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: October 9, 2020, 1:46 PM IST

ताज्या बातम्या