Home /News /national /

रामदास आठवले पोहोचले राष्ट्रपतींकडे, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची केली मागणी

रामदास आठवले पोहोचले राष्ट्रपतींकडे, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची केली मागणी

'महाराष्ट्रात स्थिती खराब होत आहे. त्यामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविद यांची भेट घेतली आहे.

नवी दिल्ली, 25 मार्च :  मुंबईत कारमायकल रोडवर सापडलेली स्फोटकांनी सापडलेल्या कार प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze case)अटक, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) प्रकरणामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एकीकडे भाजपचे नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे तर दुसरीकडे रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (ramdas athawale) थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद (president ramnath kovind) यांच्याकडे पोहोचले आहे. रामदास आठवले यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. राज्यातील परिस्थिती पाहता राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणीच आठवलेंनी केली आहे. बेरोजगार अभिनेत्याचा दुदैवी अंत; रिक्षात सापडला मृतदेह 'महाराष्ट्रात स्थिती खराब होत आहे. त्यामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविद यांची भेट घेतली आहे. यापूर्वी दहशतवादी असे प्रकार करीत होते पण आता पोलीस करीत आहे. जो पर्यंत उद्धव ठाकरे यांचे सरकार आहे तोपर्यंत योग्य चौकशी होणार नाही, अशी टीका आठवलेंनी केली. 'थाला'ची टीम दिसणार नव्या अंदाजात, लष्कराच्या सन्मानासाठी CSKची नवी जर्सी लाँच 'चौकशी करण्याची मागणी अनिल देशमुख करीत आहे. मात्र चौकशी कशी होणार.  देशमुख यांना  महविकास आघाडीचे संरक्षण देत आहे.  त्यामुळे राष्ट्रपती यांना राज्यातील महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे, अशी माहितीही आठवलेंनी दिली. राष्ट्रपती यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे, असंही आठवले यांनी सांगितले. भाजप नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट दरम्यान, भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळांनी 24 मार्च रोजी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार, मंगलप्रसाद लोढा, राधाकृष्ण विखे पाटील आदी नेते उपस्थितीत होते. राज्यातील परिस्थितीत पाहता राज्यपालांनीच यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली.
Published by:sachin Salve
First published:

Tags: President ramnath kovind, रामदास आठवले

पुढील बातम्या