मुंबई 25 मार्च**:** दाक्षिणात्य अभिनेता विरुच्छकांत (Virutchagakanth) याचा मृत्यू झाला आहे. चेन्नमधील एका रिक्षात त्याचा मृतदेह सापडला. गेल्या अनेक वर्षांपासून विरुच्छकांत बेरोजगार होता. त्याला कुठल्याच चित्रपटात किंवा मालिकेत काम मिळत नव्हतं. परिणामी आर्थिक टंचाईमुळं तो नैराश्येत होता. (Virutchagakanth Babu found dead) या नैराश्येमुळंच त्याचा मृत्यू झाला असं म्हटलं जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मात्र त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. विरुच्छकांतच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तो आई-वडिलांच्या मृत्यूनंतर फारच एकटा पडला होता. शिवाय त्याला कामही मिळत नव्हतं. त्यामुळं तो आर्थिक संकटात सापडला होता. मंदिरात मिळणाऱ्या जेवणावर तो दिवस काढायचा. या दरम्यान एका दिग्दर्शकानं त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा फोटो त्यानं सोशल मीडियावर शेअर करुन त्याला कोणीतरी काम मिळवून द्या अशी विनंती त्यानं दाक्षिणात्य कलाकारांना केली होती. परंतु कोणीही त्याला मदत केली नाही. अखेर नैराश्येत जाउन त्याचा मृत्यू झाला. अवश्य पाहा - 750 रुपयांसाठी फारुख शेख यांनी केलं चित्रपटात काम; 20 वर्षानंतर मिळाले पैसे 2004 साली प्रदर्शित झालेल्या काधल या तमिळ चित्रपटात विरुच्छकांत यानं काम केलं होतं. या चित्रपटात त्यानं एका स्ट्रगलिंग आर्टिस्टची भूमिका बजावली होती. या भूमिकेसाठी अनेकांनी त्याचं कौतुकही केलं होतं. परंतु त्यानंतर त्याला काम मिळालं नाही. त्यानं अनेक निर्माते, दिग्दर्शक, कलाकारांचे दरवाजे ठोठावले पण कोणीच त्याची मदत केली नाही. एका महत्वकाक्षी अभिनेत्याचा दुदैवी अंत झाल्यामुळं सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.