मराठी बातम्या /बातम्या /देश /अहो बाप रे! रामदास आठवलेंचा शशी थरूरना इंग्रजीबद्दल सल्ला; इंग्लिशच्या चुकाही काढल्या

अहो बाप रे! रामदास आठवलेंचा शशी थरूरना इंग्रजीबद्दल सल्ला; इंग्लिशच्या चुकाही काढल्या

फर्ड्या इंग्रजीत Tweet करत आठवलेंनी चक्क थरूरांच्या ट्वीटमधल्या चुका दाखवून दिल्या आहेत. त्यामुळे आठवले सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत.

फर्ड्या इंग्रजीत Tweet करत आठवलेंनी चक्क थरूरांच्या ट्वीटमधल्या चुका दाखवून दिल्या आहेत. त्यामुळे आठवले सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत.

फर्ड्या इंग्रजीत Tweet करत आठवलेंनी चक्क थरूरांच्या ट्वीटमधल्या चुका दाखवून दिल्या आहेत. त्यामुळे आठवले सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत.

    नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी: केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athvale) आपल्या शीघ्रकवित्वासाठी प्रसिद्ध आहेत. संसदेतही भाषण करताना ते आपल्या शीघ्रकवित्वाची झलक दाखवत असतात. अनेकदा त्यांच्या मजेदार कवितांवरून, विशिष्ट पद्धतीनं बोलण्याच्या लकबीवरून त्यांची खिल्लीही उडवली जाते. त्यांच्या अशा कविता ही त्यांची ओळख ठरली आहे. आता तर चक्क आठवले यांनी काँग्रेस खासदार शशी थरूर (Congress MP Shashi Tharoor) यांनाच इंग्रजी नीट लिहिण्याचा सल्ला दिला आहे. फर्ड्या इंग्रजीत Tweet करत आठवलेंनी चक्क थरूरांच्या ट्वीटमधल्या चुका दाखवून दिल्या आहेत. त्यामुळे आठवले सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत.

    अत्यंत उच्च प्रतीचे इंग्रजी लिहिण्यासाठी आणि बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या थरूर यांनी नुकताच ट्विटरवर अर्थसंकल्पीय अधिवेशनातील (Budget Session) एक फोटो शेअर करून रामदास आठवले यांची खिल्ली उडवली होती, त्यावर आठवले यांनी थरूर यांनाच इंग्रजीतील चुका सुधारण्याचा सल्ला दिला आहे.

    अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लोकसभेत अर्थमंत्र्यानी अर्थसंकल्प मांडल्यानंतर रामदास आठवले आदी खासदारांचा एक फोटो शशी थरूर यांनी ट्विटरवर शेअर केला असून, त्यासोबत 'अर्थसंकल्पावरील सुमारे दोन तासांच्या चर्चेनंतरचा रामदास आठवले यांचा फोटो (चेहऱ्यावरील भाव) सर्व काही सांगत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला समजले असेल की, मंत्र्यांनाही बजेट समजले नाही,' अशी टिप्पणी करत थरूर यांनी अर्थसंकल्पाची खिल्ली उडवली. या ट्विटमध्ये थरूर यांनी रिले हा शब्द वापरला असून, बजेट या शब्दाचे इंग्रजी स्पेलिंग Bydgut असे लिहिले होते.

    त्यांच्या या ट्विटला प्रत्युत्तर देताना रामदास आठवलेंनी शशी थरूर यांचे इंग्रजी चुकले असल्याचं सांगितलं. आठवले यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, शशी थरूरजी, तुमच्या ट्विटमध्ये अनेक चुका आहेत. उदाहरणार्थ, Bydgut आणि Rely ऐवजी Budget आणि Reply असं लिहायला हवं होतं. आठवले यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय बनले आहे.

    Pushpa च्या Srivalli चा इंग्लिश व्हर्जन रिलीज होताच झाला VIRAL,पाहा VIDEO

    देशात ट्विटरचा सर्वांत आधी वापर करणाऱ्या काही नेत्यांपैकी शशी थरूर हे पहिले नेते आहेत. इंग्रजीवर प्रभुत्व असणाऱ्या शशी थरूर यांचे इंग्रजीतील लेख प्रसिद्ध आहेत. सामान्यपणे वापरल्या जात नसलेल्या अनेक इंग्रजी शब्दाचा वापर ते करतात. त्यांचे लेख वाचणे ही इंग्रजी अभ्यासकांसाठीदेखील पर्वणी असते. अनेक दुर्मीळ इंग्रजी शब्द त्यांनी ट्विटरवर वापरले आहेत. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारवर टीका करताना थरूर यांनी अॅलोडोक्साफोबिया म्हणजे विचारांची अनावश्यक भीती असा शब्द वापरला होता. त्याचा अर्थ जाणून घेण्यासाठी लोकांना डिक्शनरीत त्याचा शोध घ्यावा लागला. नंतर थरूर यांनीच त्याचा अर्थ सांगितला. farrago (फार्रागो -कन्फ्यूज्ड मिक्श्चर) आणि troglodyte (ट्रोग्लोडाइट) हे शब्दही त्यांच्यामुळे लोकांच्या नजरेत आले आहेत. अशा विद्वतप्रचुर लिखाणाबद्दल प्रसिद्ध असलेल्या शशी थरूर यांनाच इंग्रजी सुधारण्याचा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे. त्यावरून त्यांची सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली जात आहे.

    First published:
    top videos

      Tags: Ramdas athawale, Ramdas Athawale (Politician), Shashi tharoor