Home /News /entertainment /

Pushpa च्या Srivalli गाण्याचा English version release होताच झाला VIRAL,मिळाले इतके लाख व्ह्यूज

Pushpa च्या Srivalli गाण्याचा English version release होताच झाला VIRAL,मिळाले इतके लाख व्ह्यूज

Entertainment news: 'श्रीवल्ली' (Shrivalli) चा इंग्लिश व्हर्जन (English Version) नुकतंच रिलीज झाला आहे.

    मुंबई, 11 फेब्रुवारी- साऊथ सुपरस्टार (South Superstar)  अल्लू अर्जुन  (Allu Arjun)  आणि रश्मिका मंदना (Rashmika Mandanna)  यांचा 'पुष्पा: द राइज' (Pushpa: The Rise)  हा चित्रपट डिसेंबर 2021 चा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने कोविडच्या निर्बंधांमध्येही भरपूर कमाई केली आहे. 250 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 350 कोटींहून अधिक कमाई केली आहे. आणि OTT द्वारे 100 कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे.चित्रपटांच्या गाण्यांनी तर अक्षरशः वेड लावलं आहे. फक्त देशातचच नव्हे तर परदेशातसुद्धा या गाण्यांची क्रेझ वाढली आहे. याच पार्श्ववभूमीवर 'श्रीवल्ली'   (Shrivalli)  चा इंग्लिश व्हर्जन (English Version)  नुकतंच रिलीज झाला आहे. 'पुष्पा' मधील तुफान लोकप्रिय झालेल्या 'श्रीवल्ली' या गाण्याचा इंग्लिश व्हर्जन आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुकुमार दिग्दर्शित 'श्रीवल्ली' या चित्रपटाचा इंग्लिश व्हर्जन नुकतंच रिलीज झाला आहे. अवघ्या काही दिवसांत या गाण्याला २६ लाख व्ह्यूस मिळाले आहेत.हे गाणं परदेशीही लोक खूप ऐकत आहेत.हे इंग्लिश व्हर्जन डच गायिका एम्मा हिस्टर्सने गायिलं आहे. या गाण्याच्या नवीन व्हर्जनबद्दल पुष्पाचे संगीत दिग्दर्शक देवी श्री प्रसाद यांनी स्वतः त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर माहिती दिली आहे. देवी श्री प्रसाद यांनी 'श्रीवल्ली' गाण्याच्या इंग्लिश व्हर्जनची लिंक शेअर करून गायिकेचं प्रचंड कौतुक केलं आहे. आणि त्याच्या मूळ गाण्याला आवाज देणारे तेलुगू गायक सिडश्रीराम यांना टॅगसुद्धा केलं आहे. सिडश्रीरामला टॅग करत त्यांनी लिहिलं आहे, "भाऊ, जेव्हा आपण हे रेकॉर्ड केलं होतं, तेव्हा मी तुला मजेत म्हटलं होतं की, चला या गाण्याचं इंग्लिश व्हर्जन बनवू पण हे @emmaheesters ने बनवलेलं एक सुंदर कव्हर आहे. तसेच या गाण्याच्या नव्या रिमेकवरही त्यांनी आपलं प्रेम दाखवलं आहे. श्रीवल्ली गाण्याने केवळ भारतीयच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केलेल्या सर्व रील व्हिडिओंमध्ये पुष्पाच्या गाण्यांबद्दलची क्रेझ दाखवली आहे. सोशल मीडिया श्रीवल्ली गाण्याच्या व्हिडिओंनी भरला आहे. प्रत्येकजण या ट्रेंडमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच मराठी कलाकारपासून बॉलिवूड कलाकरांपर्यंत अनेक जणांनी पुष्पावर अनेक रील्स बनवले आहेत. यामध्ये चाहतेसुद्धा मागे नाहीत.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Allu arjun, Entertainment, Rashmika mandanna, South film

    पुढील बातम्या