मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कबुतर पकडायला गेला अन् 200 फुट खोल विहिरीत पडला, जळगावातील तरुणाचा बुडून मृत्यू

कबुतर पकडायला गेला अन् 200 फुट खोल विहिरीत पडला, जळगावातील तरुणाचा बुडून मृत्यू

(Representative Image: Getty Images)

(Representative Image: Getty Images)

Maharashtra News: कबुतर पकडण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. कबुतर पकडताना खोल विहिरीत कोसळून या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

  • Published by:  Sunil Desale
नितीन नांदुरकर, प्रतिनिधी जळगाव, 10 एप्रिल : कबुतर (pigeon) पकडणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. कबुतर पकडण्यासाठी विहिरीत उतरलेल्या तरूणाचा पाय घसरल्याने पाण्यात बुडून मृत्यू (youth drowned after fall in well) झाल्याची घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील शेळगाव शिवारात ही घटना घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. करण उर्फ कालू चुडामण भिल असे मृतक तरूणाचे नाव आहे. जळगाव तालुक्यातील शेळगाव (Shelgaon Jalgaon) येथील तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मजूरी करून आपला उदरनिर्वाह करतो. शेळगाव शिवारातील गिरीश सदाशिव पाटील यांच्या शेतातील विहिरीजवळ कबुतर पडण्यासाठी तो गेला. त्याच्या सोबत त्याचा भाचा तापीराम दामू भील आणि पुतण्या सम्राट गोरख भिल हे देखील होते. वाचा : तरुणीचा नग्नावस्थेत मृतदेह आढळ्याचं गूढ अखेर उकललं; धक्कादायक माहिती आली समोर याच दरम्यान, विहिरीत कबुतरांचे घरटे असल्याने त्यांना पकडण्यासाठी करण विहिरीत उतरत होता. त्यावेळी त्याचा पाय निसटला आणि तो 200 फुट खोल विहिरीतील कोसळला. विहिरीत पाणी जास्त होते आणि याच पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. काका विहिरीत पडल्याचे पाहून पुतण्या सम्राट हा धावत गावात येवून माहिती दिली. वाचा : फोटोशॉपवर तयार केले अश्लिल फोटो, जळगावमध्ये तरुणीसोबत घडला संतापजनक प्रकार घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील विलास पाटील आणि नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत प्रचंड गाळ असल्याने काही तास शोध घेतला असता नागरीकांच्या मदतीने विहिरीतून मोठ्या शर्तीच्या प्रयत्नाने मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आाली आहे. मांजरीला काठीने मारहाण करुन केलं ठार, पुण्यातील महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल मांजरीला काठीने मारहाण करुन ठार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पुण्यातील महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील गोखले नगर परिसरात ही घटना घडली आहे. प्रशांत गाठे यांच्या घराच्या परिसरात एका मांजरीला शेजारी राहणाऱ्या शिल्पा यांनी ठार केलं असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी प्रशांत गाठे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर चतु:श्रृंगी पोलिसांनी संबंधित महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आधीच मांजराच्या ओरडण्याच्या आवाजाने त्या त्रस्त झाल्या होत्या आणि त्यातच मांजरीचे पिल्लू घरात शिरल्याने शिल्पा यांना राग अनावर झाला. रागाच्या भरात त्यांनी मांजराला काठीने मारहाण केली. या मारहाणीत मांजरीचा मृत्यू झाला. त्यानंतर शेजारी राहणाऱ्या प्रशांत गोठे यांनी संबंधित महिलेच्या विरोधात तक्रार दिली.
First published:

Tags: Jalgaon, Maharashtra News

पुढील बातम्या