अयोध्या, 04 ऑगस्ट: ऐतिहासिक राम मंदिराच्या (Ram Janambhumi) भूमिपूजनासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. 5 ऑगस्टला मुख्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात सोमवारपासून (3 ऑगस्ट) गणेश पुजनाने झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी रामजन्मभूमी परिसरातील भूमिपूजनानंतर (Bhumi Pujan) अयोध्येतून देशाला संबोधित करतील. पंतप्रधान मोदींबरोबरच रा. स्व. संघाचे प्रमुख मोहन भागवतही जनतेला संबोधन करतील. पंतप्रधानांच्या वेळापत्रकानुसार ते फक्त आणि फक्त राम मंदिरासंदर्भातील कार्यक्रमात सहभागी होतील. पंतप्रधान राम नगरीत सुमारे तीन तास असणार आहेत.
नरेंद्र मोदींचा संपूर्ण कार्यक्रम
- 5 ऑगस्ट रोजी सकाळी 9.35 वाजता दिल्लीहून प्रस्थान
- 10.35 वाजता लखनऊ विमानतळावर लॅडिंग
- 10.40 हेलिकॉप्टरने अयोध्येला प्रस्थान
- 11.30 वाजता अयोध्याच्या साकेत कॉलेजच्या हेलीपॅडवर लॅंडिंग
- 11.40 वाजता हनुमानगढी पोहटून 10 मिनिटे दर्शन आणि पूजा
- 12 वाजता राज जन्मभूमी परिसरात पोहचणार
- 10 मिनिटात रामलल्ला विराजमानचे दर्शन आणि पूजा
-12.15 वाजता रामलाला परिसरात पारिजातचे वृक्षारोपण
-12.30 वाजता भूमिपूजन कार्यक्रमात प्रारंभ
-12.40 वाजता राम मंदिर आधारशिलाची स्थापना
- 2.05 वाजता साकेत कॉलेजच्या हेलीपॅडकडे प्रस्थान
- 2.20 वाजता लखनऊमधून हेलिकॉप्टरने प्रस्थान
-लखनऊ वरून दिल्ली रवाना.
वाचा-ऐतिसाहिक क्षणांच्या साक्षीसाठी अशी सजली अयोध्या, पाहा डोळे दिपवणारे PHOTOS
अयोध्या नगरी सजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला भूमिपूजन होणार असून निवडक 200 लोकांनाच निमंत्रित करण्यात आलं आहे. अयोध्येतले रस्ते दुरुस्त करण्यात आले असून भिंतींवर रामायणातले चित्र काढण्यात आले आहेत. अयोध्येत ठिक-ठिकाणी सुंदर देखावेही उभारण्यात आले आहेत. अनेक मंदिरांमध्ये दिपोत्सवालाही सुरुवात झाली असून मंदिरांवर रोशनाई करण्यात आली आहे. अयोध्येतल्या शरयू नदीचा काठही सजविण्यात आला आहे. नदीवरही गंगा आरती होणार आहे. तर अयोध्येतल्या 20 हजार मंदिरांची रंग रंगोटी करण्यात आली आहे. अयोध्येच्या विकासाची योजना तयार करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्यात येणार आहे. त्याला मंदिरासारखा आकार देण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ayodhya ram mandir, Pm modi, Ram janmabhoomi