अयोध्येत ऐतिहासिक राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. 5 ऑगस्टला मुख्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात सोमवारपासून (3 ऑगस्ट) गणेश पुजनाने होणार आहे.
या कार्यक्रमासाठी सर्व अयोध्येला सजविण्यात आलं आहे. कार्यक्रमासाठी गर्दी होणार नसली तरी अयोध्येत सजावट करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला भूमिपूजन होणार असून निवडक 200 लोकांनाच निमंत्रित करण्यात आलं आहे.
अयोध्येच्या विकासाची योजना तयार करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्यात येणार आहे. त्याला मंदिरासारखा आकार देण्यात येणार आहे.