भाजपच्या चाणक्यांची राज्यसभेत अशी झाली सरशी; राहुल गांधींना वाढदिवसाच्या दिवशीच काँग्रेसला धक्का

भाजपच्या चाणक्यांची राज्यसभेत अशी झाली सरशी; राहुल गांधींना वाढदिवसाच्या दिवशीच काँग्रेसला धक्का

राज्य सभेच्या रिस्त 24 पैकी 11 जागा भाजपला मिळाल्या तर काँग्रेसच्या वाट्याला फक्त 5 जागा आल्या. कसं साधलं हे गणित?

  • Share this:

नवी दिल्ली, 20 जून : राज्यसभा निवडणुकीचे निकाल शुक्रवारी रात्री उशीरा लागले. ईशान्य भारतातल्या राज्यांबरोबरच मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानच्या निकालांकडे देशाचं लक्ष लागलेलं होतं. राहुल गांधींच्या पन्नासाव्या वाढदिवशीच हे निकाल लागले आणि काँग्रेसला आणखी एक धक्का बसला. राज्य सभेच्या रिस्त 24 पैकी 11 जागा भाजपला मिळाल्या तर काँग्रेसच्या वाट्याला फक्त 5 जागा आल्या.

मध्य प्रदेशात काँग्रेसला किमान दोन जागा मिळतील, अशी आशा होती. पण काँग्रेस उमेदवार फूलसिंह बरैया यांचा पराभव झाला. फक्त दिग्विजय सिंह यांनाच गड राखता आला.

मध्य प्रदेशात भाजपचे ज्योतिरादित्य

राज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला किमान दोन जागा मिळतील, असा अंदाज होता. प्रत्यक्षात काँग्रेसला एकच जागा मिळवता आली आहे. भाजपने मात्र दोन जागा खिशात घातल्या आहेत. राजस्थानात मात्र तीन पैकी दोन जागा काँग्रेसने मिळवल्या आहेत, तर भाजपला एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे.

मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे आणि सुमेर सिंह यांनी भाजपचा गड राखला आहे. काँग्रेसच्या केवळ दिग्विजय सिंह यांचाच विजय झाला आहे.

ज्योतिरादित्य शिंदे 56

दिग्विजय सिंह 57

सुमेर सिंह 55 काँग्रेसचं राज्यसभेचं गणित मध्य प्रदेशबरोबर गुजरातमध्येही जमलं नाही, हे रात्री उशिरा स्पष्ट झालं.

गुजरातमध्ये भाजपची चाणक्यनीती विजयी

मोदी-शहांच्या गुजरामध्ये काँग्रेसला चारपैकी किमान 2 जागा मिळण्याची आशा होती. पण तीन जागांवर भाजपच्या उमेदवारांचा विजय झाला आणि काँग्रेसच्या पदरी केवळ एकच जागा राहिली. त्यामुळे मोदींच्या गुजरातमध्ये भाजपच्या चाणक्यांनी काँग्रेसवर मात केल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजपचे अभय भारद्वाज, रमिला बारा आणि ओम नरहरी अमीन हे उमेदवार राज्यसभेवर जिंकले तर काँग्रेसच्या फक्त शक्तिसिंह गोहिल यांनाच विजय मिळवता आला.

राजस्थानात काँग्रेस आणि आंध्रात YRS

राजस्थानात अपेक्षेप्रमाणे काँग्रेस उमेदवार वेणुगोपाल आणि नीरज डांगे जिंकले आहेत. भाजपच्या राजेंद्र गहलोत यांनी विजय मिळवला आहे. पण ओंकारसिंह लखावत यांना हार पत्करावी लागली.

आंध्र प्रदेशातल्या चारही जागा YRS काँग्रेसनी जिंकल्या आहेत.

देशातल्या 7 राज्यातल्या एकूण 19 जागांसाठी मतदान झालं. त्याचे निकाल हाती आले आहेत. ईशान्येकडच्या राज्यात भाजपची सरशी झाली आहे. 24 जागांंसाठी निवडणूक होणार होती. पण कर्नाटकच्या चार जागांवर बिनविरोध निवडणूक झाल्याने मतदान झालं नाही.

राज्यसभेसाठी मतदान झालेली राज्य आणि जागा

आन्ध्रप्रदेश 04

मध्य प्रदेश 03

राजस्थान 03

गुजरात 04

झारखंड 02

मिजोरम 01

मणिपुर 01

मेघालय 01

भाजपचं लक्ष्य 9 जागा

या निवडणुकीत भाजपला 9 जागांवर विजय मिळवण्याचा विश्वास आहे. त्यामुळे भाजपचं संख्याबळ 84 होऊ शकतं. तसंच एनडीए 100 जागांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर बहुमतासाठी एनडीएला केवळ 22 मतांची आवश्यकता असणार आहे. पावसाळी अधिवेशनात AIADMK, YSRCP, DMK आणि TRS सारखे पक्ष भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे.

संकलन - अरुंधती

महाआघाडीत काँग्रेस आक्रमक, उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतरही MLCवरून तणाव

मोदींचं मोठं वक्तव्य : 'आपल्या सीमेत कोणीही घुसखोरी केलेली नाही'

First published: June 20, 2020, 7:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading