महाआघाडीत काँग्रेस आक्रमक, उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतरही MLCवरून तणाव

महाआघाडीत काँग्रेस आक्रमक, उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतरही MLCवरून तणाव

काँग्रेसने नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र प्रश्न अजूनही सुटलेला नाही.

  • Share this:

मुंबई 19 जून: राज्यपालांनी नियुक्त करायच्या 12 जागांवरून महाघाडीतला तणाव कायम आहे. काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून पक्षाला 4 जागा पाहिजे आहेत. मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेना 3 जागांसाठीच राजी आहे. त्यामुळे महाआघाडीत तणावाचं वातावरण आहे. महाआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील वाटा हा आमदारांच्या संख्येवर ठरला होता. त्यानंतर असलेल्या सत्तेत सर्वांना समसमान हिस्सा हे सूत्र ठरलं आहे. त्यानुसार विधानपरिषदच्या बारा जागांमध्ये काँग्रेसला चार जागा मिळतील यावर काँग्रेस ठाम आहे.

राज्यपाल नियुक्त 12 जागांवर महाडघाडी मध्ये रस्सीखेच सुरू आहे.  सत्तेतील संख्येनुसार शिवसेना 5, राष्ट्रवादी 4 आणि काँग्रेसला 3 जागा देण्याबाबत चर्चा सुरू होती. काँग्रेसने यावर नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र प्रश्न अजूनही सुटलेला नाही.

मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद संख्येवर आहे. त्यानंतर येणारे महामंडळ, विधान परिषद आणि राज्यसभेतल्या जागांबाबत समसमान वाटा हे सूत्र आघाडी करतांना ठरल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

या  त्यानुसार राज्यपाल नियुक्त जागांचं समसमान वाटप होईल यावर काँग्रेस ठाम आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहतोय - राऊत

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी गुरुवार दुपारी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.  यावेळी बैठकीला खासदार संजय राऊत, अनिल देसाई हे उपस्थितीत होते. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जवळपास एक तास बैठक झाली. या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

'काही विषय असे असता की, समोरासमोर चर्चा झाली पाहिजे. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. अत्यंत सकारात्मक चर्चा झाली असून आम्ही समाधानी आहोत. मागे मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली होती.  पण रश्मीताई यांच्या वडिलांचं निधन झालं होतं.

...म्हणून मी मुख्यमंत्री झालो, वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

त्यामुळे अशा दुखाच्या प्रसंगी भेट घेणे योग्य नव्हते. पण माध्यमांकडून चर्चा रंगवली गेली. आम्ही एक कुटुंब असून आमच्यात कोणतीही नाराजी नाही' असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं होत. मात्र अजुनही काँग्रेस 4 जागांवर ठाम असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यातून मार्ग काढावा लागणार आहे.

संपादन - अजय कौटिकवार

 

First published: June 19, 2020, 3:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading