Home /News /national /

हा VIDEO पाहून आता काय म्हणाल? दारूच्या दुकानाबाहेर घुंगट घेतलेल्या महिलांची रांग का लागली वाचा

हा VIDEO पाहून आता काय म्हणाल? दारूच्या दुकानाबाहेर घुंगट घेतलेल्या महिलांची रांग का लागली वाचा

दारू दुकानांसमोर झालेल्या गर्दीने अनेक ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला आहे. दरम्यान याच संबधित राजस्थानमधून समोर आलेला व्हिडीओ आणखी वाईट आहे

    जोधपूर, 06 मे : लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये दारू दुकानं पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर गावागावांत, अनेक शहरांमध्ये अगदी हॉटस्पॉट असणाऱ्या ठिकाणीही मद्यप्रेमींनी दारू दुकानांसमोर गर्दी केली होती. काही ठिकाणी तर सोशल डिस्टंसिंगचा देखील फज्जा पाडण्यात आला होता. मात्र पश्चिम राजस्थानमधून समोर आलेला व्हिडीओ आणखी वाईट आहे. पश्चिम राजस्थानमध्ये आज देखील 'घुंगट' प्रथा प्रचलित आहे. गावागावांसह जोधपूरमध्ये देखील आजही ही प्रथा पाळली जाते. अनेक महिला घुंगट घातल्याशिवाय घरात किंवा घराबाहेर दिसत नाही. मात्र आता दारूची दुकानं उघडल्यानंतर देखील या महिलांना दारू आणण्यास पाठवले गेल्याचा व्हिडीओ समोर येत आहे. याठिकाणीही या महिला 'घुंगट'मध्येच दुकानासमोर रांगेत उभ्या होत्या. (हे वाचा-मोदी सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल-डिझेलवर एक्साइज ड्यूटी वाढवली) मिळालेल्या माहितीनुसार या दुकानांसमोर पुरूषांइतक्यात महिला देखील उभ्या होत्या. याचे कारण असे की, दारूसाठी लागलेली प्रचंड मोठी रांग पाहून याठिकाणी पुरुषांनी त्यांना उभे केले आहे. जेणेकरून दारू तर मिळेल, पण रांगेत उभे राहण्याचे कष्ट नको. दारुसाठी उडालेली झुंबड पाहून देशातील काही शहरात पुन्हा दारू दुकानं उघडण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई याठिकाणी सुद्धा बुधवारपासून दारूची दुकानं बंद करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मंगळवारी यासंदर्भात आदेश जारी केला आहे. संपादन - जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या