कीर्तश पटेल, सूरत, 18 जून : साडी केल्यानंतर त्या साडीच्या बॉक्समध्ये मास्क, सॅनिटायझर, आयुर्वेदिक काढ्याची पावडर आणि होमिओपथी औषध मिळाले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण हे सर्व सूरत याठिकाणी पुरवण्यात येत आहे. कोरोनाबाबत जनजागृती पसरवण्यासाठी सूरतमधील व्यापाऱ्यांनी हा नवा उपक्रम सुरू केला आहे. साडी खरेदी करा आणि कोरोनाविरोधात मजबुतीने लढा या मिशनअंतर्गत सूरतमधील काही साडी व्यापारी एकवटले आहेत. या जागरुगता अभियानाअंतर्गत महिलांना साडी खरेदी केल्यानंतर कोरोनाशी लढणासाठी कामी येणाऱ्या या वस्तू देण्यात येत आहेत.
सूरतमध्ये ही बनलेली सा़डी खरेदी केल्यास आता त्याबरोबर एक 'कोरोना कवच' (Corona Kavach) नावाचा बॉक्स व्यापाऱ्याकडून तुम्हाला ऑफर केला जाईल. यामध्ये साडीबरोबरच मॅचिंग मास्क, सॅनिटायझर, आयुर्वेदिक काढ्याची पावडर आणि होमिओपथी औषध असेल, जे कोव्हिड 19 शी लढायला तुम्हाला मदत करेल.
फ्रीमध्ये मिळेल हे 'कोरोना कवच'
सूरतमध्ये एक मोठे टेक्सटाइल मार्केट आहे, ज्याठिकाणच्या साड्या देश-परदेशात प्रसिद्ध आहेत. सध्या लॉकडाऊन काळामध्ये व्यापाराचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता साड्यांचा खप व्हावा याकरता त्यांच्या जाहिरांतींबरोबरच जागरुकता पसरवण्याचा निर्णय या व्यापाऱ्यानी घेतला आहे.
(हे वाचा-उंची लहान, किर्ती महान!भारतीय सेनेमध्ये रूजू होण्याचं स्वप्न जिद्दीने केलं पूर्ण)
व्यापाऱ्यांच्या मते साडी ही प्रत्येक महिलेची आवडती गोष्ट आहे. सध्या प्रत्येक घरामध्ये एक जरी साडी खरेदी केली गेली तरी कोव्हिड-19 च्या विरोधात घराघरांत जागरूकता पसरेल. साडीबरोबर जे कोरोना कवच दिले जात आहे, त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही आहे. साडीचे पैसे दिल्यानंतर हे कोरोना कवच मोफत मिळत आहे. या साड्यांच्या किंमती 500 रुपयापासून 5000 रुपयांपर्यंत आहेत.
2 लाखांपेक्षा जास्त साड्यांची मिळाली ऑफर
व्यापाऱ्याचा दावा आहे की, या साड्यांची मागणी राजस्थान, यूपी, बिहार याठिकाणी जास्त आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 30 हजार साड्या विकल्या गेल्या आहेत. तर अजून 2 लाख साड्यांची ऑर्डर आहे. या फॉर्म्यूल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
(हे वाचा-VIDEO : चिनी वस्तू नको म्हणजे नकोच! पहिल्या मजल्यावरुन फेकून दिला TV आणि…)
संपादन - जान्हवी भाटकर