मराठी बातम्या /बातम्या /देश /

एक तक्रार आली RTI कार्यकर्त्याच्या जीवाशी; भामट्यांनी हात-पाय मोडून शरीरात ठोकले खिळे

एक तक्रार आली RTI कार्यकर्त्याच्या जीवाशी; भामट्यांनी हात-पाय मोडून शरीरात ठोकले खिळे

बुधवारी रात्री आरटीआय कार्यकर्त्यावर (RTI activist) प्राणघातक हल्ला (allegedly assaulted) झाल्याची घटना समोर आली आहे.

बुधवारी रात्री आरटीआय कार्यकर्त्यावर (RTI activist) प्राणघातक हल्ला (allegedly assaulted) झाल्याची घटना समोर आली आहे.

बुधवारी रात्री आरटीआय कार्यकर्त्यावर (RTI activist) प्राणघातक हल्ला (allegedly assaulted) झाल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

राजस्थान, 23 डिसेंबर: बुधवारी रात्री आरटीआय कार्यकर्त्यावर (RTI activist) प्राणघातक हल्ला (allegedly assaulted) झाल्याची घटना समोर आली आहे. राजस्थानमधील बाडमेर (Rajasthan's Barmer district) जिल्ह्यातील गिडा पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. आरटीआय कार्यकर्ते अमराराम (RTI activist Amararam) यांचे अपहरण करून अज्ञात हल्लेखोरांनी बेदम मारहाण केली. घटनेनुसार, मारहाणीनंतर हल्लेखोरांनी अमरारामला बेवारस अवस्थेत रस्त्याच्या कडेला फेकून पलायन केलं. सध्या कार्यकर्त्याला जोधपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हल्लेखोरांनी आरटीआय कार्यकर्त्याच्या पायावर सळ्यांनी हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे. त्याच वेळी, त्याच्या पायात खिळे मारुन त्यांच्या पायात सळ्या आरपार घुसवल्या. त्याचवेळी एका स्थानिक वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, हल्लेखोरांनी अमरारामला लघवीही प्यायला लावली.

आरटीआय कार्यकर्ते अमराराम यांनी 2 दिवसांपूर्वी दारू माफियांविरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती, त्यानंतर पोलिसांनी माफियांवर तत्काळ कारवाई केली. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, अमराराम अवैध दारू माफियांविरोधात सातत्याने पोलिसांना माहिती देत ​​होते. त्याचवेळी ग्रामपंचायतीमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबतही त्यांनी तक्रारी केल्या होत्या.

मारहाणीनंतर अमरराम यांचे हात आणि पाय फ्रॅक्चर

घटनेनुसार, बुधवारी संध्याकाळी जोधपूरहून आपल्या गावी चिमोनीस की धानी येथे जात असलेल्या अमरराम यांना वाटेत गाठलं. त्यानंतर स्कॉर्पिओमधून आलेल्या आठ हल्लेखोरांनी त्यांचं अपहरण करुन कुंपलिया गावातील निर्जन ठिकाणी नेलं. तेथे हल्लेखोरांनी अमरराम यांना बेदम मारहाण केली.

पोलिसांनी सांगितलं की, मारहाण केल्यानंतर अमराराम यांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना आता जोधपूरच्या रुग्णालयात रेफर करण्यात आलं आहे. त्याचवेळी आरटीआय कार्यकर्ते अमरराम यांनी या संपूर्ण घटनेवर सांगितलं की, जोधपूरहून गावात परतत असताना काही बदमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला, ज्यानंतर ते गंभीर जखमी झाले. पोलिसांनी लवकरात लवकर त्या हल्लेखोरांवर कारवाई करावी, असे अमराराम म्हणाले.

हल्लेखोरांवर गंभीर गुन्हे दाखल

याशिवाय पोलीस अधीक्षक दीपक भार्गव सांगतात की, त्यांना घटनेची माहिती मिळताच आरटीआय कार्यकर्ते अमराराम यांना उपचारासाठी नेण्यात आले असून त्यांच्यावर पोलिसांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. त्याच वेळी भार्गवच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोर पकडण्यासाठी पोलिसांनी चार पथके तयार केली आहेत आणि त्यांच्यावर अनेक गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आरटीआय कार्यकर्ते अमराराम यांनी नुकतंच त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून लिहिलं होतं की, त्यांना सतत धमक्या येत आहेत, ज्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहीन.

हेही वाचा- पुन्हा एकदा Blast..!कोर्टाच्या तिसऱ्या मजल्यावर स्फोट, 2 जणांचा मृत्यू; 4 जखमी

सध्या पोलीस हल्लेखोराांचा शोध घेत आहेत. त्याचवेळी राजस्थान राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष गोपाल कृष्ण व्यास यांनी राजस्थानचे पोलीस महासंचालक, उत्पादन शुल्क आयुक्त उदयपूर, बाडमेरचे जिल्हाधिकारी आणि एसपी यांना नोटीस बजावली असून या संपूर्ण प्रकरणाचा तथ्यात्मक अहवाल मागवला आहे.

First published:

Tags: Rajasthan