पंजाब, 23 डिसेंबर: दिल्लीनंतर (Delhi) आता पंजाबमधील लुधियाना येथील (Blast in Ludhiana court)न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर स्फोट झाला आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. स्फोटाचा आवाज ऐकून लोक घाबरले आहेत. या स्फोटानंतर सर्वत्र गोंधळ झाला आहे. हा स्फोट कसा घडला हे अद्याप समजू शकलेलं नाही. सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर हा स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, लुधियाना कोर्टाच्या कॉपी शाखेत हा स्फोट झाला. सध्या कोर्टात वकिलांचा संप सुरू असल्यानं कोर्टात फारशी गर्दी नव्हती.
An explosion was heard near the Record Room on the second floor of the Ludhiana Court complex. One person died, two persons were injured in the incident. Bomb disposal team and forensics team has been called from Chandigarh for probe. There is no need to panic: Ludhiana CP pic.twitter.com/E4WVaEedxo
— ANI (@ANI) December 23, 2021
या भीषण स्फोटानं 6 मजली इमारत हादरली. हा स्फोट तिसऱ्या मजल्यावर झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात तळमजल्यावरील वाहनांचंही नुकसान झालं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हेही वाचा- आधी दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींचं केलं अपहरण, नंतर 5 तरुणांनी केली भयंकर अवस्था सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोर्टात IED स्फोट झाला आहे. यासाठी अत्यंत जड स्फोटकांचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोट होताच न्यायालयाच्या आवारात चेंगराचेंगरी झाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट न्यायालयाच्या बाथरूममध्ये झाला. कोणीतरी येऊन हा स्फोट घडवून आणल्याचा दावा त्यांनी करण्यात आला आहे. दुपारी 12.45 च्या सुमारास हा स्फोट झाला. सध्या बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचले आहे.