मुंबई, 13 जुलै: नुसता साप पाहिला तरी आपण चोरात किंचाळतो पण सापाला हात लावणं किंवा त्याच्याशी खेळ करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. स्टीव इरवीन यांचा सुपुत्र रॉबर्ट याने असाच एक साप हातात पकडला आणि त्याला हाताळ असतानाच अचानक सापाला राग आला आणि त्यानं जोरात हल्लाही केला. 16 वर्षीय रॉबर्ट आपल्या वडिलांसारखंच वन्य जीव संरक्षणाचं काम करतो. रॉबर्टने आपल्या इन्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रॉबर्टने पिशवीतून बाहेर काढलं. तो सापाशी बोलत त्याच्या अंगावरून हात फिरवतो.
हे वाचा- 7 जण पुरामुळे नदीत अडकले, जीवाची बाजी लावून तरुणांनी वाचवलं; पाहा VIDEO संतापलेल्या सापानं फुत्कार काढत रॉबर्टच्या तोंडावर या सापानं हल्ला केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. 3 लाखहून अधिक लोकांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. वडिलांसारखाच मुलगा असल्याचं एका युझरनं म्हटलं आहे. तर अनेक युझर्सनी काळजी घेण्याचं आवाहनही केलं आहे. हा व्हि़डीओ पाहून अनेक युझर्सनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.