मुंबई, 10 जुलै : देशी तुपानं (Desi Ghee) भरलेला टँकर उलटल्यानं तूप गोळा करण्यासाठी रस्त्यावर एकच गर्दी उडाली होती. या अपघातामध्ये ड्रॅव्हर जखमी झाला. पण, त्याची कुणीही पर्वा केली नाही. अखेर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी त्याला टँकरमधून बाहेर काढत हॉस्पिटलमध्ये नेलं
राजस्थानमधील (Rajasthan) सिरोही जिल्ह्यात हा सर्व प्रकार घडला. देशी तुपानं भरलेला टँकर गांधी धाममधून रूद्रपूरला जात होता. त्यावेळी महामार्गावर चालकाचा ताबा सुटला आणि तो उलटला. टँकर उलटताच त्यामधील तूप बाहेर आणि रस्त्यावर वाहू लागले. रस्त्यावर तुपाचं तळं साचलं होतं. ते पाहाताच जवळपासच्या हॉटेल आणि ढाब्यातील कर्मचारी तूप भरण्यासाठी भांडे घेऊन घटनास्थळी दाखल झाले.
लोकांचं तूप गोळा करण्याचा प्रकार सुरू होता तेव्हा ड्रायव्हर टँकरमध्येच अडकला होता. पण, कुणीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही. अखेर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी त्याला बाहेर काढले आणि हॉस्पिटलमध्ये पाठवले. पोलिसांनी गर्दी नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला पण जमावाचे त्याकडे लक्ष नव्हते. त्यामुळे अखेर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.
भयंकर! हत्येच्या संशयावरून गावकऱ्यांनी दिली तालिबानी शिक्षा, तरूणाला जिवंत जाळलं
जवळपास 3 तास राष्ट्रीय महामार्गावर हा सर्व प्रकार सुरू होता. रस्त्यावरच तूपाचा टँकर उलटल्यानं त्या मार्गावरील वाहनचालकांनाही खबरदारी घ्यावी लागत होती. पोलिसांनी त्यांना योग्य सूचना देत आणखी कोणता अपघात होणार नाही, याची काळजी घेतली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ghee, Rajasthan, Video viral