मराठी बातम्या /बातम्या /देश /

भयंकर! हत्येच्या संशयावरून गावकऱ्यांनी दिली तालिबानी शिक्षा, तरूणाला जिवंत जाळलं

भयंकर! हत्येच्या संशयावरून गावकऱ्यांनी दिली तालिबानी शिक्षा, तरूणाला जिवंत जाळलं

कायद्याच्या राज्याला तडा देणारी एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. एका तरूणाला केरोसिन टाकून जिवंत जाळल्याचा (locals burn young man) कथित प्रकार घडला आहे.

  • Published by:  Onkar Danke
मुंबई, 10 जुलै :कायद्याच्या राज्याला तडा देणारी एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. एका तरूणाला केरोसिन टाकून जिवंत जाळल्याचा (locals burn young man) कथित प्रकार घडला आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह पुरण्यात आला. त्या तरूणावर एका नवविवाहितेला मारण्याचा आरोप होता. त्यानंतर गावकऱ्यांनी स्वत:च कोर्ट भरवलं आणि त्याला शिक्षा दिली. या प्रकरणाची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतला आहे. आसाममधील (Assam) नौगाव जिल्ह्यात हा भयंकर प्रकार घडला आहे. येथील बोर लालुंग भागात ज्या तरूणाला जनसुनावणीनंतर जिवंत जाळण्यात आलं त्याचं नाव रंजीत बोरदोलाई असल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, 'आम्हाला संध्याकाळी 6 वाजता जनसुनावणीनंतर एका व्यक्तीला जिवंत जाळून मारण्यात आल्याची माहिती मिळाली. त्याच्यावर हत्येचा आरोप होता. जाळल्यानंतर त्याचा मृतदेह पुरण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणात काही जणांना अटक करण्यात आली आहे.' नौगावमधील ज्या गावात ही घटना घडलीय, तिथं कार्बी समाजाचे अनेक लोकं आहेत. गावातील एका व्यक्तीनं दिलेल्या माहितीनुसार, 'तीन दिवसांपूर्वी या भागात महिलेचा मृतदेह मिळाला. या महिलेचं नुकतंच लग्न झालं होतं. तिची हत्या करून गावाच्या तलावात मृतदेह फेकून देण्यात आला होता.' त्या व्यक्तीनं दावा केला की, 'रंजीतने महिलेची हत्या केल्याचं काही महिलांनी ऐकलं होतं, त्यानंतर गावात जनसुनावणी झाली. यामध्ये त्या महिलांना साक्षीसाठी बोलवण्यात आलं. या सुनावणीच्या दरम्यान रंजीतनं हत्या केल्याची कबुली दिली. आपण 5 जणांसोबत या महिलेचे हत्या केल्याचं त्यानं सांगितलं.' VIDEO: भाजपा आमदाराच्या घराबाहेर सापडली चोरीची बॅग रंजीतनं सर्वांसमोर गुन्हा कबुल केल्यामंतर तिथं उपस्थित असलेल्या काही जणांनी त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर काही जणांनी त्याच्यावर केरोसिन टाकलं आणि पेटवून दिलं.' अशी माहिती त्या व्यक्तीनं दिली आहे.
First published:

Tags: Assam, Crime news

पुढील बातम्या