इटलीहून आलेल्या दाम्पत्यासह 2 वर्षांच्या मुलीला झाला कोरोना, सरकारनं 1 किमीपर्यंत लावला कर्फ्यू

इटलीहून आलेल्या दाम्पत्यासह 2 वर्षांच्या मुलीला झाला कोरोना, सरकारनं 1 किमीपर्यंत लावला कर्फ्यू

राजस्थानमधील झुंझुनू इथल्या एक दाम्पत्यासह त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीलाा कोरोनाची लागण झाल्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

  • Share this:

जयपूर , 19 मार्च : जगभरात कोरोना व्हायरसचा कहर आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच 7 हजार हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 100 हून अधिक देशांमध्ये कोरोनाचा प्रभाव असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात 169 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 3 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. 14 रुग्ण बरे झाल्याची माहिती मिळत आहे. राजस्थानमधील झुंझुनू इथल्या एक दाम्पत्यासह त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीलाा कोरोनाची लागण झाल्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरापर्यंत कर्फ्यु लावाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हे दाम्पत्य 8 मार्चला इटलीहून भारतात आलं होतं. भारतात परत आल्यानंतर सरकारकडून त्यांची तपासणी करण्यात आली. त्यांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. सवाई मानसिंह रुग्णालयात या नमुनांची चाचणी घेण्यात आली आहे. त्यामध्ये दाम्पत्य आणि त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीला कोरोना असल्याचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे. त्यांच्यावर जयपूरमध्ये उपचार सुरू आहेत. जे जे नागरिक या दाम्पत्याच्या संपर्कात आले असतील त्या सर्वांच्या टेस्ट करण्याचे आदेश प्रशाासनाकडून देण्यात आले आहेत.

हे वाचा-कोरोनासंदर्भात वुहानमध्ये गोड बातमी, 2 महिन्यानंतर पहिल्यांदाच घडला असा प्रकार

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी कोरोनासोबत लढण्यासाठी महत्त्वाची बैठक बोलवली होती. .या बैठकीत कोरोनाचा प्रादूर्भाव तातडीनं रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाव्यात यासंदर्भात चर्चा करण्यात आली. गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. तसेच मॉल, शाळा, मंदीर, गर्दी होईल अशी ठिकाणं बंद ठेवण्याचा निर्णय राजस्थान सरकारनं घेतला आहे. अत्यावश्यक कामाविना बाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून देण्यात येत आहे. आतापर्यंत भारतात जवळपास 169 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात 49 रुग्ण असल्याचं सांगितलं जात आहे. जम्मू- काश्मीरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे.

हे वाचा-धक्कादायक ! इटलीमध्ये 24 तासांत कोरोनानं घेतला 475 लोकांचा बळी

First published: March 19, 2020, 10:55 AM IST
Tags: rajasthan

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading