जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / धक्कादायक ! इटलीमध्ये 24 तासांत कोरोनानं घेतला 475 लोकांचा बळी

धक्कादायक ! इटलीमध्ये 24 तासांत कोरोनानं घेतला 475 लोकांचा बळी

धक्कादायक ! इटलीमध्ये 24 तासांत कोरोनानं घेतला 475 लोकांचा बळी

कोरोना व्हायरसमुळे जगभरात 8 हजारहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 मार्च : कोरोनानं जगभरात अक्षरश: थैमान घातलं आहे. चीननंतर आता इटलीमध्ये सर्वात जास्त कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. एका दिवसात म्हणजेच जवळपाास 24 तासांत इटलीत 475 कोरोनाग्रस्त रुग्णांचा लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ब्रिटनमध्ये मृतांचा आकडा 104वर पोहोचला आहे. धक्कादायक म्हणजे जगभरात 8 हजारहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर भारतात आतापर्यंत 169 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 44 आहेत. तर जम्मू-काश्मीरमध्ये पहिला रुग्ण आढळला आहे. तर चीनमध्ये सध्या कोरोनाची लागण झालेले नवीन रुग्ण कुणीही आढळले नसल्याची माहिती चीन सरकारनं दिलं आहे. कोरोनानं जगभरात थैमान घातलं आहे. 100 हून अधिक देशांमध्ये घुसून या व्हायरसनं जनजीवन विस्कळीत केलं आहे. या रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय ते देशपातळीवर वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. मात्र 24 तासांत जवळपास इटलीमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

जाहिरात
जाहिरात

इराणमध्ये अडकलेल्या 255 भारतीयांची कोरोना व्हायरसची तपासणी करण्यात आली. यामध्ये ही सर्वजणं कोरोना बाधित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हणजेच MEA ने (Ministry of External Affairs of India,) यांनी इराणमधील 255 भारतीयांना कोरोनाची बाधा झाल्याच्या बातमीची पृष्टी केली आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचा आकडा काढला तर 276 भारतीयांना कोरोनाची लागण झाली आहे. यानुसार UAE मध्ये 12, इटलीत 5, हाँग-काँग, कुवेत, रवांडा आणि श्रीलंकात प्रत्येकी एक भारतीयांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे देशभरातील जनजीवनावर परिणाम झाला आहे. हा व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरू नये म्हणून प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहे. त्यामुळे अनेक राज्यांतील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यातच कोरोनाचा धोका लक्षात घेत आता CBSE बोर्डाने 10 आणि 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काही दिवसांमध्ये होणाऱ्या CBSE बोर्डाच्या 10 आणि 12 वीच्या परीक्षा आता 31 मार्चनंतर घेण्यात येणार आहेत. एकीकडे CBSE बोर्डाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असला तरीही स्टेट बोर्डाकडून अद्याप असा निर्णय घेण्यात आलेला नाही. IIT आणि इतर केंद्रीय संस्थांसाठी आवश्यक प्रवेश परीक्षा JEE सुद्धा पुढे ढकलण्यात आली आहे. 31 मार्चनंतर परीक्षांच्या तारखेसंदर्भातले निर्णय कळवले जातील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात