अलवर, 07 जून : राजस्थानातील (Rajasthan) अलवरमधील (Alwar) एका घटनेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतल्याचं पाहायला मिळालं. याठिकाणी हरसौरा परिसरात हमीरपूर नावाच्या गावामध्ये रोड रोमियोंची (Road Romeo) काही तरुणींनी चांगलीच धुलाई केली. रोजच्या छेडछाडीला कंटाळलेल्या तरुणींनी अखेर दुर्गेचा अवतार घेत या सर्वांना धडा शिकवला. त्यानंतर या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
(वाचा-सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा कधी सुरु होणार?, महापौरांनी दिले 'हे' उत्तर)
राजस्थानच्या अलवर जिल्ह्यामधील हमीरपूर गावामध्ये काही तरुणी सायंकाळच्या वेळी शेतामध्ये गेल्या होत्या. त्यावेळी काही मुलंही त्यांना पाहून त्याठिकाणी आले आणि त्यांनी या तरुणींची छेड काढायला सुरुवात केली. हे तरुण पहिल्यांसगळ्यांनी मिळून या रोड रोमियोंना धडा शिकवला. विशेष म्हणजे यांच्यातील काही मुलींनीच त्याचा व्हिडिओदेखिल तयार केला आणि तो व्हायरल केला. दाच असं काही करत नव्हते. तर रोज ते अशाप्रकारे या तरुणींची छेड काढत होते. त्यामुळं या प्रकाराला तरुणीही कंटाळल्या होत्या. अखेर त्यांची सहनशक्ती संपली आणि रविवारी सायंकाळी त्यांनी या मुलांना चांगलाच धडा शिकवला.
(वाच-कोरोनानं बापलेकाचा घेतला घास; घरातील कर्ती माणसं गमावल्यानं कुटुंब पोरकं)
तरुणांनी छेड काढल्यानंतर तरुणींनी त्यांना पकडून त्यांची चांगलीच धुलाई केली. सगळ्यांनी मिळून या रोड रोमियोंना धडा शिकवला. विशेष म्हणजे यांच्यातील काही मुलींनीच त्याचा व्हिडिओदेखिल तयार केला आणि तो व्हायरल केला. यानंतर या तरुणांच्या विरोधात हरोसरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकारानंतर संपूर्ण परिसरात हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता.
या प्रकारानंतर तरुणींनी सांगितलं की, ही मुलं रोज त्याना त्रास देत होती. त्यांनी अनेकदा मुलांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण ते ऐकत नव्हते. त्यामुळं अखेर आम्ही या सर्वांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. आमचा असा अवतार पाहून ते सर्व पळून गेले असं या तरुणीनं सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणींच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच या तरुणांना अटक करून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Rajasthan