मुंबई, 07 जून: आजपासून महाराष्ट्र अनलॉक झालं आहे. पाच टप्प्यात राज्य अनलॉक झालं असून मुंबई शहर हे तिसऱ्या टप्प्यात आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महाराष्ट्र अनलॉक (Maharashtra Unlock) करण्याबाबतची नियमावली (Guidelines) जाहीर केली. दरम्यान या नियमावली नुसार मुंबईची लोकल सेवा अद्याप (Mumbai Local Trains Services) सामान्य प्रवाशांसाठी खुली करण्यात आलेली नाही. शहर अनलॉक झालं आहे मात्र मुंबईकरांसाठी लोकल सेवा कधी सुरू होणार असा प्रश्न उपस्थित होत होता. यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकल सेवा अजून तरी केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु आहे. लोकल प्रवास सर्वांसाठी खुला करायचा की नाही याबद्दलचा निर्णय एका आठवड्यानंतर घेतला जाईल. शहरातील कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर लोकल सेवेबद्दलचा अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
As unlock process begins today, few restrictions have been eased. Local trains are running only for essential services for now. Decision on whether to open it up for general public will be taken after a week, depending on COVID situation in the city: Mumbai Mayor Kishori Pednekar pic.twitter.com/b3MXyl9YEK
— ANI (@ANI) June 7, 2021
तसंच बसमध्येही फक्त बसून प्रवाशाची परवानगी आहे. उभं राहून प्रवास करण्यास मनाई आहे. पाचव्या स्तरातून येणाऱ्या जिल्ह्यातील वाहनांना मुंबईत परवानगी नसल्याचंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. तसंच 50 टक्क्यांच्या उपस्थितीत सलून, ब्युटी पार्लर आणि स्पा यांना दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यांना एसी सुरु ठेवण्यास परवानगी नसणार आहे. एसीच्या वापरावर बंधन घालण्यात आली आहेत. त्यामुळे जर एसी सुरु असल्यास आढळून आलं तर दंडही होऊ शकतो. अशी ताकीदच किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. हेही वाचा- Weather Alert! मुंबईसह कोकणात चार दिवस अतिवृष्टीचा इशारा कोविडचं संकट अद्याप संपलेलं नाही. आपण त्याला संपवण्याचा प्रयत्न करत आहोत. लॉकडाऊनंतर अनलॉक करत असताना काही नियम पाळले पाहिजेत. लोकांनी स्वयंशिस्त लावून घेतली तर पूर्ण अनलॉक होईल. त्यामुळे लोकांनी नियम पाळलेच पाहिजेत, असेही महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.